क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे तळमजल्यावरील आवारात संत सेवालाल महाराज यांचे प्रतीमेस प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशाप्रमाणे दीपक पुजारी मा. उपायुक्त (मुख्यालय) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या ‘गोर बंजारा’ समाजातील सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.
सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा यासह हा शुरवीर बंजारा समुदाय त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते. अशा थोर संताची जयंती भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त (कर) दीपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे,कार्यकारी अभियंता सुनील पाटील सहाय्यक आयुक्त नितीन पाटील, उद्यान अधीक्षक निलेश संखे ,समाज कल्याण अधिकारी स्नेहल पुण्यार्थी, प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, आरोग्य विभाग प्रमुख जे. एम.सोनावणे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
