व्हॉट्सअपवर पार्ट टाईम जॉबमधून कमिशनचे आमिष दाखवून तरुणाला ऑनलाईनने १० लाखांचा गंडा

भिवंडी


भिवंडी दि.७ ( गावकरी TODAY NEWS ) एका अज्ञात ईसमाने इंटरनॅशनल क्रमांकावरून तरुणाला व्हॉट्सअपवर संदेश पाठवून पार्ट टाईम जॉबमधून कमिशनचे आमिष दाखवून ऑनलाईनने १० लाखांचा गंडा घातल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.या फसवणूक प्रकरणी व्हॉट्सअप,टेलिग्राम खाते धारकांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महेवश करीम सैयद हा तरुण धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंडमधील रझिया इमारतीत राहत आहे.दरम्यान १८ एप्रिल ते २१ एप्रिल २०२३ रोजी वरील २ खाते धारकांनी महेवशच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून त्यास पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले.त्यानंतर त्यामधून कमिशन मिळणार असल्याचे सांगून फिर्यादीला वारंवार भामट्यांनी त्यांच्या पंजाब नॅशनल व आयसीआयसीच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले.त्यानुसार महवेशने आरोपीतांच्या बँक खात्यात ऑनलाईनने १० लाख ४५ हजार रुपयांचा भरणा केला आहे.मात्र त्यास आजतागायत मूळ रक्कमेसह कोणत्याही प्रकारचे कमिशन मिळाले नाही.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महवेशने नारपोली पोलीस ठाणे गाठून भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी खाते धारकांवर भादविच्या माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम (ड) न्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (प्रशासन) प्रमोद कुंभार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *