भिवंडी दि.7 ( गावकरी TODAY NEWS ) भिवंडी शहरा नजीक अंजूरफाटा – खारबाव रस्त्यालगतच्या खदानीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळायला गेलेल्या दोघा चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे .गणेश जोशी (१०) व पंकज जोशी (१५,दोघे रा.न्यू ओसवाल पार्क,अंजूरफाटा )अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हे दोघे चुलत भाऊ या पाणी साचलेल्या ठिकाणी खेळायला आले असता.त्यांना शेतात पाणी साचल्याचा भास झाला व त्या पाण्यात तरंगत असलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर दोघांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला असता,ओंडका ओलंडल्याने हे दोघे पाण्यात पडले .दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर पाण्यात शोधाशोध करून दुपारी या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी घटनेने जोशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे .
