भिवंडी-निजामपूर नागरी अंतर्गत पोषण पंधरवडयाचा समारोप आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला

भिवंडी

महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप व तृणधान्य महोत्सव वर्ष जनजागृती कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल 2023 बुधवारी दुपारी शहरातील कामतघर येथील मंगल भवन सभागृहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.सालाबादप्रमाणे यावर्षीही शासनाच्या परिपत्रकानुसार २० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील १४० अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान यावेळी मंगल भवनामध्ये पोषण आहार चे महत्व समजावण्यासाठी अन्नपूर्णा देवी चीचैत्र गौर आणि पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पोषणाची प्रतिकारात्मक गुढी उभारण्यात आली होती.

तसेच सदर प्रसंगी पोषण ट्रॅकर अंतर्गत काही निवडक अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कारही करण्यात आला.त्याचप्रमाणे या पंधरवड्यात पोषण अभियानाअंतर्गत गर्भवती माता,स्तनदा माता,प्रौढ स्त्रिया,किशोरवयीन मुली यांच्यामध्ये आहार आणि पोषणाबाबत जनजागृती करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी भिवंडी (नागरी) प्रताप पाटील,बाल विकास प्रकल्प अधिकारी भिवंडी-निजामपूर (नागरी) रंजना कंकाळ,ई बायोटेरियमचे राजेश पाटील आयसीडीएस अंतर्गत काम करणारे एनजीओ चे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्वांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती भोये व शर्मिला जाधव यांनी केले .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा वीर माया तडवी मनीषा रावळ आदी मुख्यसेविकांनी विशेष मेहनत घेतली.बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *