अनेकजण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की नाक मुरडतात. मात्र, मुळा आणि मुळ्याची पाने गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे.
१. मुळ्याचा तुकडा घ्यायचा, त्यावर खायचा सोडा ताखायचा व त्याने दात घासायचे, लगेचच दात पांढरे शुभ्र होतात.
२. किडलेल्या दाताने मुळा कर कर चावा, लाळ , थुंकी गिळू नका. नंतर कोमट पाण्याने चुळ भरा. हे तीन दिवस करा, कीड निघून जाईल.
३. मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
४. कच्चा मुळा पहाटे अनुशापोटी खाल्ल्याने कावीळ पूर्णत: बरी होते.
५. पाणीदार असल्याने सेवनाने भूक शमते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणा-यांनी याचं अवश्य सेवन करावं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
*************************
डॉ संतोष साळुंके दांडेगावकर होमिओपॅथी तज्ञ
