● आरोग्यासाठी बदाम खाणे अतिशय चांगले आहे, मात्र बदाम भिजवून खावेत की तसेच खायचे? हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर चला जाणून घ्या…
● बदाम हा प्रोटीन्सचा अतिशय उत्तम स्त्राेत आहे. त्यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले बदाम नियमितपणे खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.
● इतर कोणत्याही सुकामेव्यापेक्षा बदाम पचायला कठीण आहेत. त्यामुळे बदाम नेहमी भिजवूनच खावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
● भिजवलेले बदाम नेहमी सालं काढूनच खावीत. एक व्यक्ती ५ ते १० भिजवलेले बदाम दररोज सकाळी खाऊ शकते,
भिजवलेले बदाम नियमितपणे खाण्याचे फायदे
१. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मोनो सॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी मदत करतात.
२. बदामामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अतिशय चांगले असते.
३. रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत.
४. बदामामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
५. बदामामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, ओमेगा ६, मॅग्नॅशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
६. स्नायुंचा थकवा घालविण्यासाठी भिजवलेले बदाम खाणे उपयुक्त ठरते.
📍 Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
