महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत विविध स्पर्धेच्या केलेल्या उत्कृष्टपणे एकत्रितपणे सादरीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि एक लाख रुपयांची रक्कम भिवंडी महानगरपालिकेस जाहीर झाले, आज प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य, साहित्यिक वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनी मा. मंत्री ,मराठी भाषा विभाग ना.दीपक केसरकर,विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर व मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर -यांचे हस्ते व प्रमुख उपस्थिती मध्ये सदर पारितोषिक प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ व माहिती व जनसंपर्क अधिकारी सुनील झळके यांनी स्वीकारले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे काल झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये भिवंडी महानगरपालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. सुनील धाऊ झळके,
