जिल्हा परिषद कासगाव शाळेत ६० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

ठाणे


Integreon Managed Solutions गोरेगाव मुंबई व ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणी यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कासगाव शाळेत ६० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, शाळेसमोरील शेड लोकार्पण व डिजिटल साहित्य वाटप सोहळा दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडला. सीएसआर फडांतून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची पावल उचलली गेली आहेत. गोरेगाव, कोपऱ्याची वाडी, कासगाव वाडी, चिंचवली गावातून येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाण्यापर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखीली शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत मोलाचे कार्य सुरू आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांच्या सहाय्याने शिक्षण घेता यावे यासाठी एक लाख अठ्ठावीस हजार किंमतीचा एक स्मार्ट बोर्ड व चार लॅपटॉप शाळेसाठी देण्यात आले. तसेच शाळेसाठी शाळेसमोरील अंगणात भव्य असे पत्रा शेडची उभारणी करण्यात आली. तसेच शाळेतील सर्व १८३ विद्यार्थ्यांना बुट व शॉक्स मोफत देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याकरिता कारपेटची व्यवस्था कंपनीच्या मध्यमातून करण्यात आली. शाळेसाठी कंपनीकडून शौचालय सुध्दा लवकरच बांधून देण्यात येणार असल्याचे श्री. नामदेव बैकर यांनी सांगितले.

यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. जतकर, पंचायत समिती अंबरनाथचे माजी उपसभापती श्री. बाळाराम कांबरी, ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीम. मनीषा बैकर, ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणीचे सचिव श्री. नामदेव बैकर, ग्रामपंचाय कासगांवचे सरपंच श्रीम. अंजली कांबरी, उपसरपंच श्री. विकी भोईर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष राऊत, सर्व सदस्य, शाळेचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *