रेणुका विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न

भिवंडी


शालेय जीवनातील आठवणींना उजाळा
भिवंडी तालुक्यातील अंबाडी रेणुका विद्यालय झिडके येथील इयत्ता 10 वी वर्गातील सन-1981-82 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन विक्रमगड तालुक्यातील झडपोली-थापडपाडा येथील सलोरिका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आले होते.


या स्नेह संमेलनाचा मुख्य उद्देश असा की, आपल्या शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींबरोबर गेलेले दिवस आणि त्याचबरोबर काही आठवणी प्रसंग यांना उजाळा देणे,स्मरण करणे हा होय.त्याचबरोबर आपल्या उर्वरित जीवनात आनंद उपभोगत असताना सामाजिक जाणीवेतून काही काम करता येईल का? या भूमिकेतून काही अंशी चर्चा या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या मित्रमैत्रिणी समुहाचे नेतृत्व मौजे-झिडके गावाचे सुपुत्र आणि ठाणे शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम अभियंता तसेच व्यवसायिक श्री.राजू पाटील हे करीत आहेत.त्यांच्या संकल्पनेतून गेले चार वर्ष अशा स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
झडपोली-विक्रमगड येथील आपल्या स्वतःच्या सलोरिका फार्म हाऊसवर हे चौथे स्नेह संमेलन आयोजित करून,आपल्या मित्रमैत्रिणींना शाही इतमामात भोजनाची मेजवानीच देण्यात आली.याकरिता श्री.राजू पाटील यांची सहचारिणी सौ.दर्शना पाटील यांचे खूप मोठे योगदान,हे ऋणनिर्देशास पात्र असेच आहे.
एकंदरीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तसेच निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनात उपस्थित मित्रमैत्रिणींनी खेळ,नृत्य,गप्पागोष्टी,सुसंवाद आदि बाबतीत सहभाग घेतला.तसेच भविष्यात सामाजिक जाणीव ठेवून,काही काम करता येतील का? याबाबत श्री.विजय गायकवाड,डॉ.प्रदीप पाटील,श्री.मिलिंद भोईर श्री.प्रमोद भोईर,सौ.भारती पाटील आदिंनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.श्री.नौशाद पटेल यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
यानंतर स्नेह संमेलनाचा शेवट विविध स्पर्धेत भाग घेणार्‍या मित्रमैत्रिणींना क्रमांक एकदोन साठी बक्षिस वितरण श्री.राजू व सौ.दर्शना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले,व त्याचबरोबर उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना सौ.दर्शना पाटील यांच्याकडून भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
अशा प्रकारे अत्यंत आनंदमय व खेळीमेळीच्या वातावरणात हे स्नेह संमेलन संपन्न झाले बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *