: शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी यांच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा केवळ पाच ते सहा तासात शोध घेऊन तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप परत करण्यात यश मिळाले आहे.
दि.06 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:00 वा. सुमारास फिर्यादी फरीस बेगमशाह शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाणेत येऊन त्यांची मुलगी वय -10 वर्षे ही सकाळी 7:30 वा. सुमारास दुकानात खाऊ आणणेकरिता जाते असे सांगून गेली परंतु ती परत आली नाही. सगळीकडे शोध घेण्यात आला, ती मिळून न आल्याने पालकांनी कोणीतरी अपहरण केलेबाबत शांतीनगर पोलीस ठाणे गु. रजि. नं.12/23 भादवि 363 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
अपहरणाची खबर प्राप्त होताच श्री. नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त. सो. परिमंडळ2, भिवंडी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु करून श्री. किशोर खैरनार, सहा. पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी, पो. निरी (गुन्हे ) विक्रम मोहिते, बीट अधिकारी, तपास पथक, बीट अंमलदार असे तात्काळ शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी इतरत्र शोध घेण्यात आला.
भिवंडी एसटी स्टँड येथे चाहवाल्याकडे चौकशी करता सदरची मुलगी सकाळी 8:00 वा. सुमारास कल्याणकडे जाणारी बसबाबत विचारपूस करीत असल्याची माहिती मिळाली. सिसिटीव्ही फुटेज तपासून फुटेज मधी फोटो घेऊन गुन्हयाची गांभीर्यता पाहून तात्काळ सर्व पोलीस ठाणे, व्हाट्सअप ग्रुप इतरत्र फुटेज प्रसिद्ध केले. फोटो प्रसिद्ध केलेल्या आधारावर सदर मुलगी सिएसटी रेल्वे स्टेशन, येथे मिळून आली. सदर मुलीस सी डबल्यू.सी यांचे माध्यमातून ताब्यात घेऊन तिच्या पालकांचे परत केले. अवघ्या 5 ते 6 तासाचे आत अपहरण अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात आला.
सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ, भिवंडी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. किशोर खैरनार, सहा. पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी, शांतीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे )श्री. विक्रम मोहिते, पोउपनि बाळासाहेब गव्हाणे, पोउपनि घोडके,तपास पथकाचे पोउपनि निलेश जाधव, पोहवा /1865 सैयद, पोना /2887मोहिते, पोशि /8247 सुळेव बीट मार्शल अंमलदार सपोउनि श्रीधर पाटील, पोना /5278 निकम सर्व नेम शांतीनगर पो.स्टे यांनी केली आहे.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWSभिवंडी
