उत्तम नखे, उत्तम आरोग्य

लेख

**…

आरोग्य विषय…व्यक्तीच्या आरोग्यामध्ये नखांची काळजी हा केवळ सौंदर्यसाधनेच्या दृष्टीने पाहिला जाणारा विषय आहे. मात्र, नखांचे आरोग्य हे व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असते. नखांचा रंग बदलला किंवा ती पुन्हा पुन्हा तुटत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.*

*नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही आहे. सुंदर नखे जसे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्याहून अधिक ते उत्तम आरोग्याचे निदर्शक मानले जाते. त्यामुळे कुणाला कुठला आजार झाला आहे किंवा लक्षणे आहेत, याचा अंदाज त्या व्यक्तींची नखे पाहून लावता येतो.*

*न्यूरोसिसचा आजार असलेल्या रुग्णांच्या नखांवर असामान्य बारीक बारीक रक्तशिरा दिसून येते.*



*रक्ताभिसरण क्रिया बिघडल्यास नखे पातळ होतात.*

*खाली वाकलेली नखे त्वचारोग, मानसिक दुर्बलता, सिफिलीस, अॅनिमिया या आजारांचे दर्शक आहेत.*

*नखांवरील पांढऱ्या खडबडीत रेषा हे रोगप्रतिकारशक्ती क्षीण असल्याचे लक्षण आहे.*

*नखांवरील ठळक आडव्या रेषा हे नखांच्या अनारोग्याचे कारण आहे.*

*नखे खराब होण्याची कारणे.*

*ठिसूळ नखे- आनुवंशिकतेने नखे ठिसूळ तसेच कोरडी होऊ शकतात.*

*रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळेही नखे खराब होतात.*

*शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याठिकाणी बुरशी किंवा सूक्ष्म जीवजंतूंचा संसर्ग वाढू लागतो. नखांमध्ये असलेले पातळ थर या जीवजंतूंची वाढ होण्यास उत्तम जागा असते. जंतुसंसर्ग झालेली नखे फुगीर, काळी, निस्तेज दिसतात. त्यासाठी जंतुसंसर्ग रोखणारी ट्रीटमेंट घ्यावी लागते.*

*कोणती काळजी घ्यायची?*

*नखे ही आरोग्याची निदर्शक आहेत. त्यामुळे पर्यायाने नखांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आहारामध्येही पोषक घटकांचा समावेश करा, नखांसाठी कॅल्शियम अधिक असलेला आहार घ्या, संतुलित आहार, फळे ही नखांच्या वाढीसाठी पोषक असतात. नखे अधिक वाढवल्यास त्यात मळ साचून संसर्ग होण्याचे लक्षण वाढते. नखांच्या क्युटिकल्स हलक्या हाताने काढा, ती कापताना नखे दुखावण्याची शक्यता असते, नखांचा रंग बदलल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवा, नेलपेंट लावणे टाळल्यास उत्तम. त्यातील रासायनिक घटकांचा नखांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.*

*नखांचे आरोग्य.*

*तुमची नखं तुमच्या आरोग्याचा आरसा असतात, असं म्हटलं जातं.*
*उदा. निळसर नखं – हृदयाशी संबंधीत आजार, पिवळसर नखं – यकृताशी संबंधीत आजार इ.*

*१. एखाद्या बोटाचा ‘नेल बेड’ कमी होत असेल तर त्याचे कारण काय असावे? (दुसर्‍या हाताच्या त्याच बोटाच्या नेल बेडच्या तुलनेत २/३ मिमिचा तरी फरक )*
*२. कधी कधी नखांखाली पांढरे डाग येतात ते (जस्ताच्या अभावामुळे ?) माहीतच असेल. पण अगदी बारीक काळे डॉट्स कशामुळे येतात?*
*३. कधी कधी एखाद्या नखावर अगदी बारीक बारीक खड्डे का येतात? (ज्यामुळे नख वरून खडबडीत लागते).*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *