शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर आयुक्तांना धरले धारेवर!
भिवंडी: शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक रुपात पहायला मिळाली असुन. पत्रव्यवहार करूनही अनेक विषयांवर मनपा आयुक्त कारवाई करत नाही म्हणून आज अचानक शिवसेनेने गनिमी काव्याने हल्लाबोल मोर्चा भिवंडी महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे नेला. तर या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे डॅशिंग शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी केले. आणि खालील मुद्यांवर आयुक्तांना जाब विचारण्यात आला.
१)*भिवंडी महानगरपालिकेच्या करमुल्यांकन विभागाच्या संगणकातून रु. २७ लाख ची नोंद गायब करुन भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई.
२)*स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्तीला उशीर.
३)* छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा नवीन उभारण्यास दिरंगाई.
४)* काप आळी येथे स्व. आप्पासाहेब पड्याळ चौक उभारण्यास अनुत्सकता.
५)* आणि शहरातील ट्राफीक समस्या या महत्त्वाच्या विषयावर गनिमी काव्याने हल्लाबोल मोर्चा काढून आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आयुक्तांनी
विषय क्र.१* संगणकातून रु.२७ लाखाची नोंद गायब केलेल्या अधिकाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
विषय क्र. २* स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीसाठी नवीन DSR रेट ने फेर निविदा काढली असुन शिक्षक मतदारसंघाची ४ फेब्रुवारीला आचारसंहिता संपल्यानंतर येत्या एक दिड महिन्यातच रंगायतनच्या दुरूस्तीचे काम सुरु होईल.
विषय क्र.३* येत्या आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याबाबत सर्व संमतीने निर्णय घेतला जाईल.
विषय क्र. ४* स्व. आप्पासाहेब पड्याळ चौकाचे काम एक महिन्याच्या आत सुरु केले जाईल.
विषय क्र. ५* च्या मुद्यावर खुपच खडाजंगी झाली. संपूर्ण शहर रोजच्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहे. याबाबत ट्राफिक विभाग महानगरपालिकेवर खापर फोडते तर मनपा ट्राफीक विभागावर. म्हणूनच दोन्ही प्रशासनाने एकत्रित मिटींग घेऊन या विषयावर मार्ग काढून लोकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याचे ठरले.
तसेच स्व. विलासराव देशमुख उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडुन जड वाहनास प्रवेश देऊन शहरातील ट्राफीक कमी करण्याच्या सुचना करण्यात आल्या
उपरोक्त सर्व विषयांवर तब्बल १ तास सविस्तर चर्चा झाली. मा. आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नियोजित वेळेत न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी दिला. बिरो रिपोट गावकरी टुडे भिवंडी
