कोयना क्षत्रिय मराठा समाज संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

भिवंडी


कबड्डीच्या थरार आणि जीवनगौरव गुणगौरव साजरा
अंबाडी दि.३०(प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील महाळुंगे येथे कोयना क्षत्रिय मराठा समाज संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन भव्य कबड्डी स्पर्धा, जीवनगौरव, गुणगौरव आणि महिलांचे हळदीकुंकू समारंभ भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन संपन्न झाले.यावेळी विनायक मोरे,विठ्ठल मोरे,सचिन मोरे,एच.बी.जंगम,बळीराम शिंदे,शिराज लालकाका, अनुराग शर्मा,प्रवीण दळवी आणि भूपेश घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमात दोन दिवसीय भव्य समाज स्तरीय कबड्डी स्पर्धा,जीवनगौरव सन्मान आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. सदरच्या कबड्डी स्पर्धेत ठाणे,रायगड,रत्नागिरी, चिपळूण,सातारा आणि पालघर या जिल्ह्यातील २१ संघ सहभागी झाले होते.दोन दिवस चालू असलेल्या या स्पर्धेत चित्तथरारक सामने होऊन अंतिम सामना कोयना वेळे आणि जय भवानी नगर यांच्यात होऊन कोयना वेळे संघ विजयी झाला.विजयी संघाला भव्य चषक आणि रोख पारितोषिक देऊन मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग,सरचिटणीस सुरेश प्रभू राष्ट्रीय खेळाडू दशरथ शिंदे,अरुण म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी शिस्तबद्ध संघ म्हणून देऊळवाडी क्रीडा मंडळ यांना तर सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून केदारनाथ वेळे संघाचा विपुल चव्हाण याला गौरविण्यात आले.


सदरच्या स्नेहसंमेलनात नऊ जणांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी पालघर जिल्ह्यातील उचाट सारख्या दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यशवंत मोरे यांना शिक्षण महर्षी म्हणून सन्मान करण्यात आला. तर सुरेश मोरे आणि सुरेश कदम यांना पोलीस खात्यात राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. सदरच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसुधारक सुरेश (नाना) मोरे, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे,प्रताप शिंदे,संध्या मोरे,दिलीप कदम,जयवंत दरेकर,सुरेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन अध्यक्ष विजय मोरे,शिवाजी साळुंखे, सुरेश साळवी,दिलीप कदम,कृतिका कदम,मिलिंद मोरे आणि प्रसिद्धिप्रमुख अमोल कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *