
अँड. किरण. डी. चन्ने
अनिल गजरे यांच्या गावकरी टुडे वेब पोर्टलला शुभेच्छा..…

मागील अनेक वर्षांपासून स्थानिक केबल व त्यानंतर youtube च्या माध्यमातून गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून अनिल गजरे पत्रकारिता करत आलेले आहेत.ग्रामीण भागात गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यांना वाचा देखील फोडली आहे.बदलत्या माध्यमांचे कल, वाचकांची आवड, त्याचबरोबर जगभर होणार ग्लोबलायझेशन याचा विचार करता अनिल गजरे हे आता गावकरी टुडे या त्यांच्या यूट्यूब चैनलच्या नावाने वेब पोर्टल सुरु करत आहेत.
वेब पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास अधिक जोमाने होणार आहे याची आम्हाला आशा आहे.जन सामान्यांच्या समस्या व वाचकांची आवड यांची सांगड घालत ते आपल्या वेब पोर्टलवर उत्तमोत्तम बातम्या प्रसारित करून जन सामान्यांना न्याय देतील अशी आशा व्यक्त करतो,आणि आपल्या पुढील वाटचालीस व गावकरी टुडे या वेब पोर्टलच्या नव्या सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा ….

सर्व प्रथम अनिल गजरे यांच्या अथक प्रयत्नांना निळा सलाम

आमचे मित्र अनिल गजरे, हे पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. म्हणजेच 2011/12 पासून त्यांनी पत्रकारिते मध्ये पदार्पण करून पत्रकारिता कशी असते याचा प्रत्यय दाखवून दिला आहे, सध्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गजरे यांनी त्यांच्या गावकरी टुडे news वेब साईटचे लोकार्पण सोहोळ्याचे आयोजन केले आहे. आजपावेतो त्यांनी मिळविलेल्या यशापेक्षा दुप्पट यश त्यांना मिळो आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा आणखी नावलौकिक होवो या सदिच्छा
शुभेच्छुक ,संतोष जा चव्हाण
अध्यक्ष भिवंडी प्रेस क्लब
मी प्रिंट मिडिया मध्ये,२०१३ पासून, पत्रकार म्हणून बारामती विभातून काम पहात होतो.पण सोशल मिडिया च्या माध्यमातून जशी गावंकरी Today News चे मुख्य संपादक, मा. अनिल जी गजरे साहेब यांच्या बरोबर ओळख झाली,तेंव्हा पासून इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रामध्ये एक पत्रकार ते कार्यकारी संपादक अशी एक वेगळी ओळख निर्माण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात एक सच्चा पत्रकार म्हणून नवा-रुपाला आलो.

उद्या २६.जानेवारी रोजी,गावंकरी Today News चे वेबसाईट पोर्टल चा लोकार्पण सोहळा पार पडत आहे, त्या निमित्त माझ्या कडून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा..!
या न्यूज चैनेल साठी माझ्याकडे शब्द चं अपुरे आहेत,संपादक साहेब यांच्याकडे अनुभवाचा खजिना (खाण )चं आहे.व ते एक जिद्दी व मला हे स्वप्न साकार करायचे आहे, त्यासाठी ते जिवाचे रान करतात,व पिडीत, अन्यायग्रस्त,गरीब-गरजूंना आपल्या न्युज च्या माध्यमातून आवाज उठवितात. व सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,वैद्यकीय,धार्मिक,क्रिडा यांसह अनेक क्षेत्रांमधील घडामोडीवर लक्ष ठेवून त्याचे प्रसारण करून,ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य अनेक वर्षांपासून करत आहेत.त्यांच्या बद्दल बोलावे तेवढे कमी चं आहे.
या माझ्या गावंकरी Today News च्या,वेबसाईटवर पोर्टल ला माझ्याकडून,माझ्या कुटुंबियांकडून व माझ्या मित्रपरिवाकडून,व समस्त बारामती करांकडून पुन्हा एकदा कोटी-कोटी शुभे
पत्रकार रियाज पठाण.बारामती.
मी अजय भोसले ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव गेली 10 वर्षा पासून मी ह्या संस्थेच्या कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहे ,एकलव्य गौरव पुरस्कार, वंचितानाच्या रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्यख्यानमालिका, साठी हिरजी गोहिल स्मृती एकलव्य क्रीडा स्पर्धा, संविधान सन्मान यात्रा, समता संस्कार शिबिर आशा अनेक उपक्रम आम्ही ठाणे शहरातील वस्त्यांन मध्ये चालवत आहोत

. व तर गावकरी टुडे न्युज चैनल मी गेल्या एक वर्षी पासून पाहतो..तर सामाजिक. सांस्कृतिक. शैक्षणिक. क्राईम.. आशा बातम्या देऊन काही तरी वेगळे माडून गावकरी नेहमीच प्रसार करण्यासाठी सक्षम आहे.. येत्या २६ जानेवारी रोजी गावकरी टुडे न्युज वेब साईट पोल्टर न्यूज चालू होत आहेत या १२ वर्षे यशस्वी वाटचाल करून सामाजिक बांधीलकी जपून अन्याय. अत्याचार. भ्रष्टाचार.. विरोधात नेहमीच अग्रेसर होऊन काम केले आहे.आम्ही समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने गावकरी टुडे न्युज या वेब पोर्टल मिडियाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
आपला,अजय आनंदी महादेव भोसले
सचिव,समता विचार प्रसारक संस्था
.
मि बाळासाहेब बाबासाहेब ढेरे मु पो बोडखा बु ता घनसावंगी जि जालना मी एक शेतकरी आहे तर गावकरी टुडे न्युज चैनल मी गेल्या एक वर्षी पासून पाहतो..तर सामाजिक. सांस्कृतिक. शैक्षणिक. क्राईम.. आशा बातम्या देऊन काही तरी वेगळे माडून गावकरी नेहमीच प्रसार करण्यासाठी सक्षम आहे..

येत्या २६ जानेवारी रोजी गावकरी टुडे न्युज वेब साईट पोल्टर न्यूज चालू होत आहेत या 12 वर्षे यशस्वी वाटचाल करून सामाजिक बांधीलकी जपून अन्याय. अत्याचार. भ्रष्टाचार.. विरोधात नेहमीच अग्रेसर होऊन काम केले आहे.आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने गावकरी टुडे न्युज या वेब साईट मिडियाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अनिल गजरे यांच्या अथक प्रयत्नांना सलाम

आमचे मित्र अनिल गजरे, हे पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. म्हणजेच 2011/12 पासून त्यांनी पत्रकारिते मध्ये पदार्पण करून पत्रकारिता कशी असते याचा प्रत्यय दाखवून दिला आहे, सध्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गजरे यांनी त्यांच्या गावकरी टुडे news वेब पोर्टल साईटचे लोकार्पण सोहोळ्याचे आयोजन केले आहे.त्यांनी मिळविलेल्या यशापेक्षा दुप्पट यश त्यांना मिळो आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा आणखी नावलौकिक होवो या सदिच्छा |
शुभेच्छुक ,सय्यद नकी हसन , पत्रकार , न्यूज 14
