अवजड वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेश बंदी

भिवंडी



भिवंडी दि.१७ ( गावकरी TODAY NEWS ) ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राच्या हद्‌दीत जड अवजड वाहनांमुळे वर्दळीच्या वेळेमध्ये तसेच शहरातील गर्दीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्व ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्राच्या हद्‌दीतील मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे सर्वसामान्य जनतेच्या हिता साठी ठाणे जिल्ह्यात महामार्गा वरून येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याची अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज  शिरसाट यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध केले आहेत.ही प्रवेश बंदी प्रयोगिक तत्वावर लागू करण्यात येत असून या अधिसूचनेनुसार १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १२ या दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.या बाबत काही हरकती व सूचना असल्यास वाहतूक विभागाच्या ठाणे तिन हात नाका येथील वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पंकज शिरसाट यांनी केले आहे.या नुसार भिवंडी तालुक्यात अहमदाबाद व मुंबई नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी शहर व ग्रामीण भागात दखल होणार नाही.

नारपोली वाहतूक उप विभाग क्षेत्रात :-
गुजरात कडून चिंचोटी नाका मार्गे नारपोली वाहतूक विभागाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

भिवंडी वाहतूक उप विभाग क्षेत्रात :-
वाडा रोड नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना पारोळ फाटा  (नदीनाका) येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

कोनगाव वाहतूक उप विभाग क्षेत्रात :-
वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व अवजड (१० बाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना धामणगांव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

रांजनोली चौकातून भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त वाहनांना रांजनोली नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

कल्याण वाहतूक उप विभाग क्षेत्रात :-
नाशिक कडुन मुंबई येणाऱ्या सर्व अवजड (१० बाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना भिवंडी तालुक्यातील बासुरी हॉटेल (सरवलीगांव) येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

नाशिक महामार्गाकडून बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण न्हावाशेवा येथे जाणे करीता बापगाव वरून गांधारी मार्गे येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त वाहनांना ) ठाणे ग्रामीण ह‌द्दीतील पडधा पोलीस ठाणे ह‌द्दीतील तळवली चौकी येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *