भिवंडी दि.१० ( गावकरी TODAY NEWS ) महावितरणकडून ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी इंधन समायोजक शुल्क (एफएसी) लागू करण्यात आल्याची माहिती महावितरणने एका प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे त्यांच्या फ्रांच्यायजी असलेल्या टोरंट कंपनीला दिली आहे.त्यामुळे येथील ग्राहकांना महावितरणकडून इंधन समायोजन शुल्क आकारणी ऑगस्ट महिन्यात लागू होणार आहे.असे टोरंट पावर कंपनीने सांगितले असून त्यामुळे ग्राहकांना बिलात थोडी वाढ होणार असल्याचेही म्हटले आहे.महावितरणच्या परिपत्रकानुसार,सरासरी इंधन समायोजन शुल्कातील वाढीने प्रति युनिटमागे ग्राहकांना वर्ग, स्लॅब नुसार सुमारे ३० पैसे अधिक मोजावे लागणार असल्याची माहिती टोरंट कंपनीने दिली आहे.तर (एफएसी) नियामक पद्धत महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमइआरसी) यांच्या मान्यतेने वीज खरेदी व इंधन खर्चातील बदलांची भरपाई करण्यासाठी केली जात असल्याची माहितीही टोरंट कंपनीने दिली असून अधिक माहितीसाठी टोरंट कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहनही टोरंट कंपनीने ग्राहकांना केले आहे.
