भिवंडी: चळवळ हि नेहमी तरुण असते , चळवळ कधीच म्हातारी होत नाही त्यामुळे चळवळीचे कार्यकर्ते देखील नेहमी चिर तरुण असतात,त्यांना म्हातारपणाचे भय नसते असे प्रतिपादन दलित पँथर व आंबेडकरी चळवळीचे जैष्ठ कार्यकर्ते ज वि पवार यांनी केले आहे.शनिवारी कवाड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या भिवंडी शाखेच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पवार बोलत होते.
पुरोगामी महाराष्ट्रात हळू हळू चळवळी लयास चालल्या आहेत.आपल्या हक्कासाठी चळवळ जिवंत ठेवणे गरजेचे असून दलितांवर अन्याय अत्याचार वाढत होते तेव्हा दलित पँथर संघटना आक्रमक पणे ग्रामीण भागात कार्यरत होऊन दलित बंधू भगिणींचे रक्षण करत होती.आता मात्र या चळवळी लयास चालल्या असल्याची खंत देखील पँथर ज वि पवार यांनी व्यक्त करत आंबेडकरी समाज गाफील राहिल्यास भविष्यात समाज गुलामगिरीकडे वाटचाल करेल अशी भीती व्यक्त करत त्यामुळे आंबडेकरी समाजाने जागृत रहाणे गरजेचे आहे असा सल्ला देखील पँथर पवार यांनी यावेळी दिली.
आंबेडकरी समाजाला दिलेल्या २२ प्रतिज्ञा व धम्म दीक्षा यावर पवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भिवंडी तालुक्यातील आंबेडकरी समाजातील सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी महिला व नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुक्याच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
