गणेश भक्तांनी गणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तालावांचा वापर करावा,महापालिका आयुक्तांचे गणेश भक्तांना आवाहन

भिवंडी

  भिवंडी दि.४( गावकरीTODAY NEWS ) राज्य शासनाने सण उत्सव साजरे करताना पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुषंगाने आगामी गणेशोत्सवात गणेश भक्तांनी पर्यावरण पुरक देखावे, पर्यावरण पुरक मूर्तींचा वापर करावा तसेच मुर्ती विसर्जन करण्याकरीता कृत्रिम तलावांचा वापर करावा.असे आवाहन महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील गणेश भक्तांना केले आहे.नैसर्गिक तलावात, नदीच्या पाण्यात गणेश मुर्ती विसर्जन करू नये असे अभिप्रेत आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोत्रांचे जतन करणे व जलप्रदुषण टाळणे हा भाग महत्वाचा आहे.पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करताना किमान  घरगुती गणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव याचा वापर करावा.असे निर्देश राज्य शासनाचे आहेत. त्यानुसार भिवंडी शहरात घरगुती गणेश विसर्जनाकरीता श्री गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिम  तयार करण्यात आले आहेत.दरम्यान भिवंडी शहरात प्रभाग समिती क्र.२ अंतर्गत कल्याण रोड, टेमघर पाडा, मंगलमुर्ती कॉम्प्लेक्स समोर रिध्दीसिध्दी काँम्पलेक्स बाजुला, प्रभाग समिती क्र.३  जुने कार्यालय ,महापालिका शाळा क्र. २३,५९,६१, व ५५ च्या आवारामध्ये ,प्रभाग समिती क्र. ४ मध्ये  बाळू पाटील चौक नारपोली तर प्रभाग समिती क्र.५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अपना मेडीकलच्या बाहेरील असेलेली मोकळी जागा या ठिकाणी घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करून सर्व गणेश भक्तांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *