टोरेंट पॉवरद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षण जागरूकता..

भिवंडी



भिवंडी टोरेंट पॉवरने १० जुलै रोजी पडघ्यातील कुरुंद येथील बी.बी. पाटील इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित केले होते. या जनजागृती सत्रात शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. शाळांमध्ये असे सत्र आयोजित करण्यामागचा टोरेंट पॉवरचा उद्देश मुलांमध्ये वयाच्या प्राथमिक टप्प्यात विद्युत सुरक्षा सवयी लावणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी सत्रादरम्यान एक प्रश्नमंजुषा घेण्यात आली व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.टोरंटने प्रत्येक विद्यार्थ्याला मराठीत खास डिझाईन केलेला साप – शिडी या शैक्षणिक खेळाचे वाटप केले.या अनोख्या खेळाने विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात लागू केलेल्या सुरक्षा उपायांचे सर्जनशीलपणे स्पष्टीकरण करण्यास मदत होते. या सत्राला विद्यार्थी आणि शाळा प्रशासन दोघांकडून प्रचंड उत्साह मिळाला. बी.बी. पाटील इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने टॉरेंट पॉवर लिमिटेडच्या विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली.

या सत्रात चेतन सुपेकर,ठाणे सहायक विद्युत निरीक्षक मोनिका संदीप मराडे, मुख्याध्यापिका अनामिका राहुल विशे उपस्थित होते.असेच सत्र यापूर्वी एन.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श विद्यालय, स्कॉलर्स इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नारपोली, अमजदिया हायस्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम हायस्कूल, आणि त्रिमूर्ती विद्या मंदिर शाळा या ठिकाणी पार पडले आहेत.तर अशी सत्रे विविध शाळांमध्ये राबवणार असल्याचे टोरेंट पॉवरने  सांगितले आहे. टोरेंट पॉवर लिमिटेडचा ‘सुरक्षा जागरूकता उपक्रम’ हा आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह समुदायाला विद्युत अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *