तालुक्यातील कल्याण – भिवंडी वाहिनीवरील पिंपळघर परिसरातील सिंगर ऑर्केस्टा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच कोनगाव पोलिसांनी छापा टाकून बार मॅनेजर, कॅशियर,३ पुरुष वेटरसह २ महिला वेटर आणि ७ ग्राहकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.मॅनेजर मंज्जुनाथ लक्ष्मैयां नाईक,कॅशियर प्रदिप कैलाश बेहरा,महिला वेटर दामिनी गजेंद्र धनावत,बबीता दालचंद गुप्ता,पुरुष वेटर संजय रंजित चौधरी,विशाल नंदकुमार गुप्ता,अरूण रामखिलावन गुप्ता,ग्राहक मनोज अशोक भोईर,चेतन संतोष भोईर,हरेकृष्ण उध्दव साहु,राजु भैवेलाल सरोज,तपन मृत्युंजय दास,मुक्कमील मरग्युब हनिफ,उदय बाबुराव पेडणेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या १४ जणांची नावे आहेत.या कारवाईने बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.कोनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील पिंपळघर येथील स्टार स्टीलच्या बाजूला असलेल्या ऑर्केस्टाबारच्या नावाखाली सिंगर ऑर्केस्ट्रा बार ॲन्ड रेस्टॉरंट बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असून सदर बार हा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती कोनगाव पोलिसांना मिळाली होती,त्यानुषंगाने पोलिसांनी ९ मे रोजी रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास सिंगर बारवर छापा टाकला.त्यावेळी बारबाला ग्राहकांना दारूचे ग्लास भरून देवून अश्लील हावभाव करत असताना आढळून आल्याने पोलिसांनी बार मॅनेजर, कॅशियर,३ पुरुष वेटर्स,२ महिला वेटर व ७ ग्राहकांसह १४ जणांवर कोनगाव पोलिस ठाण्यात पोशि रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून सर्वांना सीआरपीसी ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस दिली आहे.पुढील तपास पोह गोरे करीत आहेत.
