पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल

लेख

*आरोग्य विषयक माहिती.*
************************
डॉ संतोष साळुंखे 9960421979

*
————————————-

मॉर्निंग रुटीनमध्ये काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल

पोट कमी करायचं म्हटलं की स्ट्रिक्ट डाएट आणि व्यायाम करणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. (Weight Loss Tips) बरेचजण वजन कमी करण्यासाठी शॉर्ट कट शोधण्याच्या प्रयत्नात असतात. (Fat Loss Tips) वजन कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय मॉर्निंग रुटीनमध्ये काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

नॅशलन लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार बडिशेप आणि मेथी व्हिटामीन, खनिजे आणि एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असते. (ref) ज्यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते. यातील इंग्रिडएंट्समध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. ज्या लोकांना पचनाच्या संबंधित समस्या उद्भवतात त्यांनी बडिशेप आणि मेथीच्या पाण्याचे सेवन केले तर गॅस्ट्रिक एंजाईम्स वाढून पचनक्रिया चांगली राहते.

रोज सकाळी चालता तरी सुटलेलं पोट कणभरही कमी होत नाही? वॉकिंगची ‘योग्य वेळ’ पाहा, पटकन बारीक व्हा

बडिशेप आणि मेथी दोन्ही कमी कॅलरीज आणि फायबर्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वेट मेनेजमेंट होण्यास मदत होते. मेथीने ब्लड शुगर स्तर नियंत्रित होते यात सोल्यूबल फायबर्स असतात. ज्यामुळे पोटाची शुगर अब्सॉर्बशन स्लो होतो आणि इंसुलिन रेजिस्ंटेंसमध्ये सुधारणा होते.

मेथी आणि बडिशेपेचं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.

मेथीत थर्मोजेनिक इफेक्ट्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. फास्ट मेटाबॉलिझ्म एक्सेस कॅलरीज जाळण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी हायड्रेट राहणं फार महत्वाचे असते. बडिशेप आणि मेथीचे पाणी प्यायल्याने हायड्रेट राहण्यास मदत होते. यातील माईल्ड डाययुरेटिक गुण असतात जे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. हे पाणी प्यायल्याने तुमचं वजन वाढत नाही.

बडीशेप आणि मेथीचे पाणी कसे तयार करायचे?

१ चमचा बडिशेप आणि १ चमचा मेथी दीड ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा. उरलेलं पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी पिऊ शकता.

मेथी आण मनुक्यांचे पाणी

बडिशेपेचं पाणी तुम्ही रोज पिऊ शकता पण मेथीचे पाणी रोज पिऊ नका. मेथीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला ब्लोटींगस, एसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

मेथी आणि बडिशेपचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल दिसतात.

मेथी आणि बडिशेपेचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. पोट फुलण्याचा त्रास होत नाही. रोज याचे सेवन केल्यानं पोट फुलण्याची समस्या उद्भवत नाही. अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवत नाही. बडिशेप आणि मेथीचे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो. तिखट खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर हे पाणी प्यायल्याने जळजळ होत नाही. भूकही नियंत्रणात राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *