भिवंडी शहरात ते आत्तापर्यंत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांच्या माध्यमातून झालेली जनहिताची कामे

भिवंडी

*……*

1) मोफत नेत्र तपासणी शिबिर-

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *152* मोतिबिंदू शिबिराच्या माध्यमातून *76000* रुग्णांची तपासणी करून *7830* रुग्णांना चष्मे व *4305* मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

2) *मोफत जनरल कॅम्प-*
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *60* जनरल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 30 हजार रुग्णांची तपासणी करून *13394* रुग्णांना मोफत औषधे व *1050* रुग्णांच्या जनरल आजारांच्या(हर्निया, गर्भपिशवी, मुतखडा,लहान गाठी इत्यादी) शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

3) *ब्लड डोनेशन कॅम्प-*
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये *32* ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून *854* ब्लड बॅग संकलित करण्यात आल्या. तसेच *559* लोकांना मोफत ब्लड देण्यात आले.

4) *दिव्यांग साहित्य वाटप-*
एकूण *503* दिव्यांग बांधवांना मोफत कुबडी, व्हीलचेअर, कॅलिपर्स इत्यादी साहित्य मोफत वाटप करण्यात आले.

5) *नोटबुक वाटप-*
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून *104* मनपा शाळा व *11* माध्यमिक शाळांमधील *52* हजार विद्यार्थ्यांना *3* लाख वह्यांचे वाटप प्रतीवर्षी मागील तीन वर्षांमध्ये मोफत करण्यात आले.

6) *विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र -*
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातुन भिवंडी शहरामध्ये *42* मोफत क्लासेस व 10 कौशल्य विकास केंद्र सुरू करून जवळपास *15530* हुन आधिक विद्यार्थीनींना मोफत मेहंदी,ब्युटीपार्लर, शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले.


7) *किट वाटप*
आपत्कालीन पूर परिस्थितीत भिवंडी शहरातील विविध भागात *100000* किट व *20000* गरजूंना जेवणाचे डब्बे देण्यात आले आहेत.


8) *इंग्लिश स्पीकिंग क्लास-*
इंग्लिश स्पिकिंग क्लास सुरू करून *1079* विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आला.


9) *नर्सिंग/ Ac रिपेयरिंग क्लास-*
*160* विद्यार्थीनींना मोफत नर्सिंग क्लासेस व *120* विद्यार्थ्यांना *AC* रिपेयरिंग क्लासेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले.


10) *साडी वाटप-*
शहरातील *850* आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांना व पोलीस भगिनींना कृतज्ञतेची भाऊबीज म्हणून प्रत्येक वर्षी पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले.

11) *दाखले वाटप-*
विविध प्रकारचे सरकारी दाखले, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, इ श्रम कार्ड, निराधार योजना, अपंग योजना *10270* गरजूंना कार्यालयातून बनवून देण्यात आले आहेत.


12) *पत्रे वाटप-*
आपत्कालीन काळात घरांची पडझड झालेल्या *80* घरांना *740* पत्रे मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

13) *आर्थिक मदत-*
उच्च शिक्षण घेणाऱ्या व कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या *34* गरजूंना *14 लाख 65 हजार रुपये* आर्थिक मदत देण्यात आली आहे.

14)शांतीनगर येथील जीर्ण कब्रस्तानसाठी *2* लाख *50* हजार रुपये किमतीच साहित्य जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले.

15) *महिला सक्षमीकरण-*
*165* बचत गटांच्या माध्यमातून विविध सक्षमीकरण योजना राबविण्यात आल्या. *3300* महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करून महिलांना आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण ह्याबाबत माहिती देण्यात आली.

16)भिवंडी शहरातील सर्व ट्राफिक पोलिसांना एकत्रीकरण करून त्यांना प्रत्येक वर्षी सन्मानित करण्यात आले.

17)भिवंडी शहरात जिजाऊ संघटनेच्या 30 शाखांचे उदघाटन करण्यात आले. 70 शाखा प्रस्तावित आहेत.

18)भिवंडी शहरात शांतीनगर येथे 1 जिजाऊ मोहल्ला क्लिनिक उघडण्यात आले. रोज 100 ते 150 नागरिक रोज त्याचा लाभ घेतात. लवकरच 9 क्लिनिक भिवंडी शहरात उभारण्यात येणार आहेत.
अशी माहिती कैलास भोईर जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था भिवंडी पश्चिम अध्यक्ष यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *