आरोग्य विषय माहिती | उपाशी पोटी इन्सुलिन व HBA1c

लेख


आजकाल ह्या तपासण्या करायला सांगतात. काही डॉ. तर ह्या तपासण्या केल्या शिवाय त्यांच्या ग्रुप मध्ये घेत नाहीत.

कारण?
*सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर ह्या तपासण्यांचे रिझल्ट्स हे इंडिकेटर आहेत  पुढील भविष्यात तुमचा लठ्ठपणा वाढेल का व तुम्हाला type 2 मधुमेह होण्याचा धोका किती आहे हे सांगण्याचे.*

*उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी ५ पेक्षा कमी असेल तर तुम्हाला वजन वाढीचा धोका फारसा नाही. परंतु हि लेव्हल १० पेक्षा जास्त असेल तर वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स,type २ मधुमेह,PCOD , लठ्ठपणा या सर्वांचा धोका खूप जास्त असतो.*

*इन्सुलिन – मला मधुमेह नाही, मग मी इन्सुलिन ची काळजी/ विचार का करू? इथे एक गोष्ट क्लिअर करते ती म्हणजे उपाशीपोटी इन्सुलिन म्हणजे उपाशी पोटी ची रक्तातील साखर नव्हे. पण उपाशीपोटी हि पातळी जास्त असणे हाच धोका आहे.*

*उपाशीपोटी इन्सुलिन का वाढते?*
*सतत, वर्षानु वर्षे अति प्रमाणात कार्बोहायरेट्स खाल्ल्याने रक्तात मिसळलेल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जादा इन्सुलिन स्रवते. Because we are not diabetic.*

*दिर्घ काळ असे झाल्याने सतत इन्सुलिन स्रवते व त्याची पातळी वाढते. असे झाल्याने शरीर कोडगे बनते व त्या इन्सुलिन चा परिणाम होईनासा होतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात.(hyperinsulinemia ) आजकाल होणाऱ्या सर्व असंसर्गजन्य आजारांचे म्हणजेच लठ्ठपणा, हार्मोनल इम्बॅलन्स,type २ मधुमेह, संधिवात, हृदयरोग,कॅन्सर  व इतर अनेक आजारांचे मूळ कारण हायपरइंसुलीनिमिया /इन्सुलिनरेझिस्टन्स हेच असते हे जगातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच या आजारांना आहार निर्मित चयापचय व्याधी असे संबोधले जाते. Diet induced metabolic disorders.*

*HBA १c  – मुळे गेल्या ३ महिन्यात तुमची रक्तातील साखर किती होती हे समजते. वारंवार अति प्रमाणात कार्बोहैड्रेट्स किंवा processed food खाल्ल्याने कधीतरी रक्तात वाढलेली साखरही यात समजू शकते. त्यावरून भविष्यात मधुमेह होण्याचा धोका समजू शकतो. HBA १c – ५.५ पेक्षा कमी असणे म्हणजे no risk.*

*“Let food be thy medicine and medicine be thy food.” ― Hippocrates . औषधा चा जनक. Hippocrates- father of medicine म्हणतात अन्न हे औषध समजून खा.*

*मी म्हणते “काय खाताय याचा समजून घ्या अर्थ, कारण उतरणार आहे रक्तात त्याचाच अर्क”*

*सौ संगीता पतकी , आहार तज्ञ.* *रिव्हायवल हेल्थ. ९८२३०१४४४६*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *