भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या खानीवली येथील मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उत्साहात भुमीपुजन करण्यात आले.भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या प्रयत्नांनी व सततच्या पाठपुराव्यामुळे खानिवली ते वारलीपाडा, खानिवली ते खैरपाडा ,खानीवली ते अंब्यांचा पाडा येथे नवीन रस्ता तयार करणे तसेच खानीवली गांव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे ही विकासकामे मंजुर झाली असुन त्याचे भुमीपुजन आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन नुकतेच करण्यात आले.ही सर्व विकासकामे मार्गी लागल्याने स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.या भुमीपुजन कार्यक्रमा प्रसंगी खानिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता दळवी, उपसरपंच- रुपाली मारुख, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका भालेराव ,सुलभा गवारे,शैलेश तुंगारे, संजय डमाळे, युवासेना पदाधिकारी अजय मोरे, निलेश मोरे, राहूल दळवी ग्रामपंचायत लिपीक समीर पडवळ सह खानिवली गावचे ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
