भिवंडी भगवतकथा ऐकण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींच्या सोन्याच्या चैन हातचलाखीने चोरून अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शोभदेवी श्यामलाल गुप्ता ही मानसरोवर परिसरात राहत असून ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मानसरोवर पोलीस चौकीच्या बाजूला भगवत कथेच्या कार्यक्रमानिमित्ताने अतुलजी महाराज यांच्या भगवत कथेचा कार्यक्रम ऐकण्यासाठी गेली होती.दरम्यान अज्ञात चोरट्याने कार्यक्रमाच्या गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने तिघींच्या गळ्यातील २ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याची चैनची चोरी करून घटनास्थळावरून चोरटा पसार झाला आहे.याप्रकरणी शोभादेवीच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
