ओला वाटाणा …म्हणजेच मटार

लेख

*आरोग्य विषयक माहिती.*
**********************

➖➖➖➖➖➖➖➖.
*मटार*
———————————–

मटार ही हिवाळ्यात खाल्ल्या जाणा-या लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. परंतु ही गुणांनी परिपुर्ण आहे हे खुप कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या मटारचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांपासुन वाचवते. .

*कोलेस्ट्रॉलची समस्या*
हिरव्या मटारमध्ये असे गुण आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलला वाढू देत नाही. हिरव्या मटारमध्ये शरीरातुन ट्रायग्लिसराइड्सच्या स्तराला कमी करण्याचा गुण असतो. यामुळे याच्या सेवनाने ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल संतुलित राहतो.

*हृदय रोगांसाठी*
हिरव्या मटारच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधीत आजार होण्याची शक्यता खुप कमी होते. यामध्ये अँटीइनफ्लैमेटरी कम्पाउंड आणि अँटीऑक्सीडेंस भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराला हृदय रोगांपासुन वाचवतात.

*कमकुवत हाडे*
हिरव्या मटारचे दाने व्हिटॅमिन ‘के’ युक्त असतात. यामुळे हे खाने हाडांसाठी खुप फायदेशीर आहे. हे ऑस्टियोपोरोसिसच्या रोग्यांसाठी खुप फायदेशीर आहे.

*कँसरपासुन वाचवते*
मटार शरीराला कँसरपासुन वाचवते. नियमित हिरव्या मटारचे सेवन करणे शरीरातुन विषारी आणि कँसर एलीमेंटला दूर पळवते. म्हणजेच अँटीकँसर प्रॉपर्टी प्रमाणे काम करते.

*एजिंग साइन दूर राहतात*
हिरव्या मटारमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट असतात. जे स्किनला दिर्घकाळ तरुण ठेवतात. याव्यतिरिक्त हिरव्या मटारमध्ये फ्लैवानॉड्स, फाइटोन्यूटिंस, केरोटिन असते. जे शरीराला ऊर्जावान बनवून ठेवतात.

*विसरभोळेपणा*
हिरव्या मटारचे जास्त सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. यासोबतच शरीराला फुफूसांच्या आजारांपासुन लढण्यात ताकत मिळते.

*वजन वाढवण्यासाठी*
नियमित जिममध्ये वर्कआउट आणि जॉगिंग करण्यापेक्षा चांगले तुम्ही नियमित मटारचे सेवन करावे. हिरवी मटार, उच्च फायबरने भरपूर असते. जिचे सेवन केल्यामुळे बॉडीला एनर्जी मिळते परंतु फॅट वाढत नाही.

*चेह-यावरील फाइनलाइन्स*
चेह-यावर जर फाइनलाइन्सची समस्या असेल तर काही दिवस मटारच्या पिठाचे उटने चेह-यावर लावत राहा. तुमची ही समस्या दूर होईल. भाजलेल्या मटारचे दाने आणि संत्र्याचे साल बारीक करुन त्याचे उटने बनवा आणि शरीरावर लावा. तुमच्या शरीराचा रंग उजळून निघेल.

*बोटांवर सूज*
हिवाळ्याच्या दिवसात जर बोटे सुजले तर मटारचा काढा बनवा. थोड्याशा गरम काढ्यामध्ये बोटे बुडवून ठेवा. यासोबतच गोड तेल लावून बोटांना धूतले पाहिजे.

*डायबिटीजच्या रोग्यांसाठी फायदेशीर*
हिरव्या मटारमध्ये उच्च फायबर आणि प्रोटीन असतात. जे बॉडीच्या ब्लड लेव्हलला नियंत्रित करतात. यामुळे याचे सेवन डायबिटीक लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *