भिवंडी दि.17( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील धामणकर परिसरातील व्यवसायिक त्याचा हॉटेल बंद करून पत्नीसह मोटारसायकलने घराच्या दिशेने निघाला असता त्याच्या पाठीमागून दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी व्यवसायिकाच्या गळ्यातील चैन हिसकावून धूम स्टाईलने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.या चोरीप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धामणकर नाका येथील रवी भजिया सेंटरचे मालक शिवाजी देवराम राठोड हे १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दुकान बंद करून पत्नी शीतल यांना घेऊन मोटारसायकलने मानसरोवर येथील घराच्या दिशेने जात असताना ते मानसरोवर चौकातील वऱ्हाळदेवी तलावाच्या बाजूला आले असता,त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी शिवाजी राठोड यांच्या गळ्यातील चैन हिसकावली.दरम्यान शिवाजी यांनी आरडाओरडा केल्याने त्याठिकाणी परिसरातील नागरिक एकवटले होते.मात्र चोरट्यांनी जमावाला शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देवून आसबीबी चौकाच्या दिशेने पळ काढला आहे.या चैन चोरीचा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोऊनि रविंद्र पाटील करीत आहेत.
