भिवंडी दि.14 ( गांवकरी TODAY NEWS ) छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वर्षे राज्याभिषेक आणि विश्व हिंदू परिषदेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी भिवंडीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य शिव शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.ही शिवशौर्य यात्रा कल्याण शहरमार्गे कोनगाव येथे पोहोचली असता भिवंडीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी यात्रेचे स्वागत केले.दिवसभर शहरातील विविध भागात फिरल्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शौर्य यात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले.या कार्यक्रमात शहरातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कल्याण नाका येथे भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित गुप्ता व त्यांच्या टीमचे सदस्य सत्येंद्र केसरवाणी, विशाल उमर वैश, धीरज केसरवाणी, पंकज सोनी, नीरज मौर्य, अरविंद केसरवाणी, चंद्रभान जैस्वाल, सतीश केसरवाणी, संतोष गुप्ता, सचिन केसरवाणी आदी शिवसैनिकांनी शौर्य यात्रेत सहभाग घेतला.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संयुक्तपणे बाईक रॅली आणि पुष्पवृष्टीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकात आयोजित सभेचे प्रमुख मार्गदर्शक ऍड. दीपक गायकवाड म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा गौरव झाला.लोकशाही हे हिंदुत्वाचे एक रूप आहे.हिंदू धर्म आणि संस्कृती नीट समजून घेण्याची गरज आहे.लोकशाहीत प्रत्येकजण स्वतंत्र असतो, लोकशाहीने परिपूर्ण असलेला हिंदू समाज सर्वांना समानतेने वागवतो आणि आपल्याला हिंदू संस्कृतीचा अभिमान असायला हवा, असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पिलंजे गावात काही दिवसांपूर्वी धर्मांतराला आळा घालणाऱ्या माजी सैनिक, माजी स्वातंत्र्यसैनिक तसेच आदिवासी महिलांचा साडी देऊन गौरव करण्यात आला.चिंतामणी महाराज, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत मंत्री संदीप भगत, मनोज रैचा, विजय वल्लाल, दादा गोसावी, राजू पाटील, यात्रा प्रमुख वैभव महाडिक, प्रमिला भोईर, मानसी पुण्यर्थी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणारे व शांतता राखणारे प्रमुख पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांचाही व्यासपीठावर विशेष सत्कार करण्यात आला.
