भिवंडी दि.12 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील दोन वेगवेगळ्या परिसरातून १ लाख ४५ हजार ४१६ रुपयांची वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणी टोरेंट कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अफसर अन्वर मेमन,अंबादास भगवान शेळके व सुधीर अंबादास शेळके अशी गुन्हा दाखल झालेल्या वीज चोरट्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील वेताळ पाडा येथील बॉंबेवाला कंपाउंडमधील बैतुल रेहमान अपार्टमेंटच्या रूम नं.३०१ च्या अफसर मेमन ह्याने ६ जून २०२२ ते ५ जून २०२३ पर्यंत टोरेंट कंपनीच्या मिनी सेक्शन पिल्लरमधून दोन कोर काळ्या रंगाची केबल अनधिकृतपणे जोडून विजमिटरच्या ५०१३ युनिटचा वापर करून ८९ हजार ८७९ रुपयांची वीजचोरी केली आहे.तर अंबादास व सुधीर शेळके या दोघांनी ते राहत असलेल्या गायत्री नगरमधील घर क्र.५३९ मध्ये ५ एप्रिल २०२२ ते ४ एप्रिल २०२३ पर्यंत मिनी सेक्शन पिल्लरमधून टोरेंटच्या अधिकृत केबलला अनधिकृतपणे दीड एसक्यूएमएम काळ्या रंगाची केबल जोडून विजमिटरच्या ३१५० युनिटचा वापर करून ५५ हजार ५३७ रुपयांची वीजचोरी केली आहे.याप्रकरणी टोरेंट कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
