भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) महावितरणने महाराष्ट्रातील महावितरणच्या ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२३ च्या बिलिंग महिन्यापासून इंधन समायोजन शुल्क (एफएसी) आकारण्याबाबत ३० सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक जाहीर केले आहे.त्यानुषंगाने सध्याच्या प्रति युनिट दराव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या बिलांमध्ये एफएसी शुल्क अतिरिक्तपणे लागू केले जाईल.अशी माहिती टोरेंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदानिया यांनी दिली आहे.यामध्ये निवासी श्रेणीतील ग्राहकांसाठी अतिरिक्त शुल्क १५ पैसे प्रति युनिट ते ३५ पैसे प्रति युनिट स्लॅबनुसार आहे.त्याचप्रमाणे, २७ एचपी पर्यंतच्या यंत्रमाग ग्राहकांसाठी ०.०७३ पैसे प्रति युनिट आणि त्यावरील यंत्रमाग ग्राहकांसाठी ०.०९८ पैसे प्रति युनिट वाढ केली जाणार आहे. दरम्यान महावितरणच्या परिपत्रकानुसार, एफएसी शुल्क सर्व श्रेणीतील ग्राहकांना लागू आहे.या वाढीव शुल्काबाबत सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल, अशी माहिती टोरेंट पॉवरने दिली आहे.शिवाय, ग्राहकांच्या बिलावर यासंबंधीची नोंद देखील समाविष्ट केली जाणार असून ग्राहक सेवा केंद्र/टोल-फ्री हेल्प-लाइनवरून टोरेंटचे ग्राहक एफएसीचे तपशील मिळवू शकतात.अशी माहितीही टोरेंटने ग्राहकांसाठी दिली आहे.
