उच्च शिक्षण हिच कर्मवीरांना दरांजली-प्रदिप वाघ

भिवंडी




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार उघडुन देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुळे मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आडोशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यी शिक्षण घेत असुन,गोर गरीब विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन कर्मवीरांना आदरांजली अर्पण करावी अशी अपेक्षा प्रदीप वाघ यांनी आडोशी आश्रमशाळा येथे कर्मवीर जंयती कार्यक्रमाच्या निमित्ताने केली ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आडोशी गावातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा असलेला रथ फिरवून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
आश्रमशाळेच्या प्रांगणात भव्य मंडपात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेतील मुलांनी लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले.वर्ष भरातील विविध प्रकारच्या स्पर्धा मधुन उत्तम कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थीनीं कर्मवीर जंयती बदल भाषण केले, तसेच रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील व रयत शिक्षण संस्थेचे कार्याचा देखावा मांडला होता.
शाळेचे मुख्याध्यापक कापडणीस सर व शिंदे सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून शाळेच्या कामकाजाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती हे अध्यक्ष तर प्रमोद कोठेकर नगरसेवक,बाळु घाटाळ सरपंच हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच संतोष घाटाळ, नंदकुमार वाघ उपसरपंच, दिगंबर पाटील,बाळु मुळे, प्रकाश गांगुर्डे,भारत बुधर, शंकर दिवे,अनुसया पाटील, आरोहण संस्थेचे युवराज गोंदके, मधुकर शिंदे, भाऊ पाटील इत्यादी पदाधिकारी,पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *