रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी


भिवंडी दि.13 ( गांवकरी TODAY NEWS ) कामानिमित्ताने निघालेल्या दुचाकीस्वारास रिक्षा चालकाने पाठीमागून जोरात धडक दिली असता,झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारा पूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी धामणकर नाका परिसरात घडली आहे.याप्रकरणी मयत तरुणाच्या मित्राच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष गोपाळ प्रसाद केजरीवाल (५५) असे रिक्षाच्या धडकेत मयत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत संतोष हा त्याच्या ज्युपिटर दुचाकीवरून ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कामानिमित्त कल्याण नाक्याकडून धामणकर नाक्याच्या दिशेने जात असताना जुना मुंबई आग्रा हायवे रोडवरील सिटीजन हॉस्पिटलसमोर आला असता,त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात रिक्षा चालकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली,या अपघातात संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला होता.तर या घटनेनंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार झाला.त्यावेळी मयत संतोषच्या मित्राने गंभीर अवस्थेत संतोषला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.त्यानंतर शहर पोलिसांनी संतोषचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठवला असून या अपघात प्रकरणी मयत संतोषचा मित्र लक्ष्मणसिंह किशोरसिंह शेखावत याच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात ३०४ (अ) सह २७९,१३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि झोले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *