भिवंडीत चंदनबागच्या राजाचे जल्लोषात स्वागत ; श्री क्षेत्र बद्रीनाथच्या देखाव्यात विराजमान होणार बाप्पा

भिवंडी


भिवंडी दि.12 ( गांवकरी TODAY NEWS ) ‘गणपती बाप्पा मोरया,’मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषाने भिवंडीत कामतघर येथील चंदनबागच्या गणरायाचे १० सप्टेंबर रोजी रविवारी रात्री मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे.डिजे,ढोलताशा पथकाच्या तालावर नृत्य करीत स्व.पंडित नाना मित्र मंडळाने उत्साहात बाप्पाचे भिवंडी नगरीत स्वागत केले आहे.सदर मंडळाचे हे गणेशोत्सव आयोजनाचे यशस्वी ३४ वे वर्ष आहे.सदर गणेशाची मूर्ती मुंबईतील परेळमधून भिवंडीत आणण्यात येवून हा भव्य गणेशोत्सव आगमन सोहळा सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास धामणकर नाका परिसरातून सुरू झाला.त्यानंतर रात्री १२ वाजता चंदनबागेत समाप्त झाला.तर चंदन बागच्या राजाच्या विराजमानासाठी श्री क्षेत्र बद्रीनाथ मंदिराच्या कलात्मक प्रतिकृतीचा देखावा यावर्षीच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष साईनाथ रंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.तसेच त्यांनी शहरातील बाप्पांचे आगमन खड्डयांमधून होत असल्याने आणि शहरातील मोठ्या वृक्षांची कापणी महापालिका प्रशासनाकडून न झाल्याने आगमन सोहळ्यात बाधा निर्माण होत असल्याने प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून आयुक्तांनी गणपती विसर्जना दरम्यान तरी,खड्डे बुजवण्यासह झाडांची छाटणी करावी अशी विनंती आयुक्त अजय वैद्य यांना केली आहे.दरम्यान गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत अनेक नामवंत कलावंतांसह राज्यातील नेतेमंडळीची मांदीयाळी येणार असल्याचे त्यांनी सांगितले असून यावेळी प्रथमच परिसरातील घरगुती गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करून पारितोषिके दिली जाणार आहेत.यासह नागरिकांसाठी संस्थांच्या माध्यमातून शिबिर ठेवले जातील.आणि मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे ज्या भक्तांना चारधाम यात्रेला जाणे शक्य होत नाही,त्यांनी चंदन बाग राजाच्या दर्शनाला येवून आपली ईच्छापूर्ती करावी.असे आवाहनही त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील गणेश भक्तांना केले असून यामधूनच मंडळाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा बद्रीनाथच्या देखाव्याचा हेतू साध्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.तर गतवर्षी याच मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा उभारण्यात आल्याची माहिती साईनाथ पवार यांनी दिली.दरम्यान या आगमन सोहळ्याप्रसंगी गणेश भक्तांनी हर्षोल्हासात बाप्पांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *