नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा ; एकास अटक,दुसरा साथीदार फरार

भिवंडी


भिवंडी दि.२९ ( गांवकरी TODAY NEWS ) नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपची विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या दोन नशेच्या सौंदागरांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.तबरेज अब्दुल रहमान मोमीन (४१) असे अटक करण्यात आलेल्या माफियाचे नाव आहे.तर त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे दोन्ही माफिया शहरातील कॉटरगेट परिसरातील नदीम पैलवान यांच्या पाठीमागील झोपडीत राहत आहेत.दरम्यान त्यांनी ते राहत असलेल्या झोपडीत ३० हजार २२५ रुपये किमतीच्या (डायक्लोराईड फॉस्फेट) नशेसाठी व गुंगीकरिता वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपच्या एकूण १५५ बाटल्या विक्रीसाठी बाळगल्या असल्याची खबर शहर पोलिसांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाल्याने पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झोपडीत छापा टाकून सदर माल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलीस नाईक राहुल जालिंदर पवार यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भादविच्या औषधे व सौंदर्य प्रसाधने यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तबरेज यास अटक केली असून त्यास सोमवारी २८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता ११ सप्टेंबरपर्यंत अधिकची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर त्याचा साथीदार आवेश अब्दुल रेहमान मोमीन उर्फ टीटू हा फरार झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास पोऊनि कोलते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *