आरोग्य विषयक माहिती, “भोजनाचे नियम”

लेख



*१) भोजन नेहमी खाली मांडी घालून बसूनच करावे. उभे राहून प्राण्यांप्रमाण जेवण करू नये. कारण प्राण्यांचा गुरुत्वाकर्षण केंद्र बिंदू वेगळा असतो व आपला वेगळा असतो.*

*२) डायनिंग टेबलचा वापर भोजनासाठी करू नये. प्रसंगी खुर्चीवर बसावे लागल्यास मांडी घालून बसावे.*

*३) ज्याची पचनसंस्था चांगली आहे, त्याने खाल्लेल्या अन्नापासून व्यवस्थितपणे १) रस, २) रक्त, ३) मांस ४) मेद, ५) अस्थी, ६) मज्जा, ७) शुक्र (वीर्य) हे सप्तधातू बनतात. तसेच मल, मूत्र व घाम हे तीन मल बनतात. ज्यांची पचनसंस्था खराब झाली आहे, त्यांच्या शरीरात हे धातू व्यवस्थित निर्माण होत नाहीत.*

*४) ज्याच्या शरीरात सप्तधातू व्यवस्थित बनतात, त्याच्या शरीरात सप्त धातूंचा पोषक अंश म्हणजे ओज चांगला असतो. ज्याचा ओज चांगला ती व्यक्ती निरोगी व दीर्घायुषी असते.*

*५) भोजन करताना भोजनाचे पात्र पाटावर असल्यास जास्त चांगले म्हणजे वाकावे लागणार नाही.*

*६) भोजन करताना प्रत्येक घास ३२ वेळा चावून खावा. त्यापेक्षा अधिक वेळ चावल्यास चालेल. अन्नाची तोंडातच बारीक पेस्ट झाली पाहिजे. अन्न प्यावे व पाणी खावे म्हणजे अन्न पाण्यासारखे पातळ करून खावे व पाणी खावे म्हणजे पाणी तोंडात जास्त वेळ ठेवावे, मग प्यावे.*

*७) सकाळचे भोजन सूर्योदयानंतर अडीच तासांत करावे. सकाळचे भोजन भरपूर खावे कारण सूर्योदयानंतर अडीच तासापर्यंत जठराग्नी सर्वांत जास्त प्रखर असतो. दुपारी मंद होतो.*

*८) कष्टकऱ्याने (शेतकऱ्याने) दिवसातून ३ वेळा (सकाळी, दुपारी, संध्याकाळी) भोजन करावे.कष्टाचे काम नसलेल्या व्यक्तींनी दोनच वेळ (सकाळी, संध्याकाळी) भोजन करावे.*

*दिवसभर थोडे थोडे खाऊ नये. शक्यतो संध्याकाळी भोजन थोडे कमी करावे. सकाळचे भरपूर करावे.*

*दोन भोजनांच्या मधे कमीत कमी ४ तास व जास्तीत जास्त ९ तास अंतर असावे.*

*९) भोजनानंतर लगेच पळू नये किंवा जोराने चालू नये. • लहान मुलांनी मात्र ४ वेळा जेवण करावे. अर्थात भूक लागल्यास खावे. भूक नसताना खाऊ नये. तसेच भुकेपेक्षा जास्त खाऊ नये. भूक लागल्यावर उशीर लावू नये, लगेचच जेवावे. शरीराच्या गरजेप्रमाणे खावे मनाप्रमाणे नाही.*

*१०) भोजन सावकाश करावे. भोजन करताना मानसिक ताण नसावा. बीपी हाय नसावा. असल्यास अन्नाचे विष तयार होते
*११) टीव्ही पाहत भोजन करू नये. त्यामुळे डायबेटिस होण्याची शक्यता वाढते.*

*१२) अन्न शिजविल्यानंतर एका तासात खावे. शक्यतो गरम गरम, ताजेच खावे. शिळे अन्न खाऊ नये. कारण शिजविलेले अन्न एका तासाने खराब होण्यास सुरुवात होते.*

*१३) पावसाळ्यात पालेभाज्या कमी खाव्यात. बाकीचे आठ महिने भरपूर*
*खाव्यात. फळे सकाळी अथवा दुपारी खावीत. संध्याकाळी नको..*

*१४) दुपारच्या भोजनानंतर लगेच २० मिनिट वामकुक्षी घ्यावी. म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे. झोप लागल्यास अर्ध्या तासापर्यंत झोप चालेल. कारण दुपारी पित्त प्रभावी असते. वामकुक्षीमुळे पित्त शांत राहते. दुपारच्या वामकुक्षीनंतर पुन्हा आपल्याला सकाळच्या सारखीच शक्ती मिळते. माणूस पुन्हा सकाळच्या प्रमाणे तेज होतो. जगातील शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे. दुपारची वामकुक्षी १ तास म्हणजे रात्रीची ६ तास झोप होय*

*१५) रात्रीच्या भोजनानंतर २ ते २.५ तास झोपू नये. रात्रीच्या भोजनानंतर शतपावली करावी*



16)भोजन झाल्यावर लगेच लघवीला जावे. लघवीला आले नसले तरी; कारन भोजन करताना आपला बीपी वाढतो. लघवी केल्यावर ते सामान्य होते.*
*डालडा, मॅगी हे पदार्थ खाऊ नयेत कारण यामध्ये डुकराच्या चरबीचे ते वापरतात.*

17) भोजनात गोड पदार्थ असेल तर तो सुरुवातीलाच खावा. शेवटी तिखट अथवा आंबट चालेल. मात्र संध्याकाळी आंबट खाऊ नये*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *