महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिके मार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा शाळा, मान्यता प्राप्त अनुदानित/विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विविध वयोगटातील खेळाडू विद्यार्थ्यांचे विविध खेळांचे जिल्हास्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजनाकरीता मा. उप-आयुक्त (क्रीडा) श्रीमती प्रणाली घोंगे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा शिक्षक यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य. याचे परीपत्रकानुसार, शालेय क्रीडा स्पर्धेत विविध ९० खेळांचा समावेश आहे. या ९० खेळांपैकी ४६ खेळांचे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. भिवंडी शहरातील क्रीडा शिक्षक यांचे विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे असे मा. उप-आयुक्त (क्रीडा) श्रीमती प्रणाली घोंगे यांनी क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत जाहिर केले,
या बैठकीला तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सायली जाधव, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती रुही शिंगाडे, भिवंडी मनपा माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख सुनिल झळके, शरद कलावंत क्रीडा अधिकारी भिवंडी महानगरपालिका आदि उपस्थित होते.
मा. उप-आयुक्त (क्रीडा) पुढे म्हणाल्या भिवंडी नि. शहर महानगरपालिकेतील सर्व माध्यमिक शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धेत किमान ३ सांघिक व २ वैयक्तीक क्रीडा प्रकारात सहभाग घेण्यात यावे. अशा विविध महत्वपूर्ण सुचना मा. उप-आयुक्त (क्रीडा) यांनी या बैठकीत केल्या.

