जि. प. ठाणे येथे स्वतंत्र दिन ध्वजारोहण समारंभ संपन्न

ठाणे





भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चे प्रशासक तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेचे प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण प्रसन्न होऊन गेले तसेच कन्या शाळेतील विद्यार्थ्यीं तर्फे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्य गीत सादर करण्यात आले.



‘मेरी माट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानांतर्गत पंचप्राण शपथ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत घेण्यात आली. तंबाखू मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेण्यात आली.

‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक श्रीम छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) श्री अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीम. ललिता दहितुले, जिल्हा पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ‌. समिर तोडंणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. वैजनाथ बुरुडकर तसेच इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी
जिल्हा परिषद ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *