भिवंडी: दि.०३ ( अनिल गजरे )महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांचा आदर्श तहसीलदार पुरस्कार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाई,
उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे,सुदाम परदेशी,विश्वास गजरे,रेवती गायकर,
अर्चना कदम यांसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत,
अप्पर भिवंडी येथील मंडळ अधिकारी अतुल नाईक,शेलार येथील मंडळ अधिकारी किरण भागवत,अव्वल कारकून श्रीमती मंजुषा कासने,कारीवली येथील तलाठी रूपेश कारभारी,कोतवाल श्रीमती चैतन्या पवार यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे.