।।श्री स्वामी समर्थ।।

लेख

🔥🔥🔥🔥🔥🟩🔥🔥🔥🔥🔥
*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*

*देवघरात देवाच्या फोटो समोर बसून एक चित्ताने मनापासून देवाला आठवावे किंवा प्रार्थना, नामस्मरण करावे हीच सर्वात सोपी उपासना आहे. बाकी काही करण्याची गरजही नाही. देव तुमच्या सोबत असल्यावर सर्वत्र यश मिळणारच. देवाकडून पैसा, सुख, शांती, संपत्ती मिळत नाही तर त्याच्यावर विश्वस ठेऊन प्रयत्न केले तर किंवा धर्माप्रमाणे चांगले वागले तर जे जे मागाल ते देवाकडून मिळते. देवाची सेवा केली तर थोडेफार फळ मिळते परंतु चांगले कर्म केले तर कर्माचे चांगले फळ तुम्हाला द्यावेच लागते हा निसर्ग नियम आहे. देवळात एकाचवेळी असंख्य भक्त प्रार्थना करतात, पण तुमच्या घरातील देव तुमची एकट्याची प्रार्थना सहज स्वीकारतो एवढे लक्ष्यात आले तरी भरपूर आहे. खरं तर देह काळाच्या अधीन आहे, आणि धन कुबेराच्या अधीन आहे. मग तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर धनाची गरज नाही, तर मनाची गरज आहे. कारण संसारात येऊन लोक जगतात; पण का जगायचं आणि कोणासाठी जगायचं हे फार कमी लोकांना कळतं. त्यामुळे संसारात आला आहात तर त्या भगवंताला शरण जा म्हणजे तो तुमचं सर्व दु:ख हिरावून घेईल.

*🔸संकलन-सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*🏵🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🏵*

🔥🔥🔥🔥🔥🟩🔥🔥🔥🔥🔥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *