ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल शिंदे यांचा मुलगा सागर अनिल शिंदे एल एल बी उच्च श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल प्रशंसा करण्यात आली.


उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे यांनी वाहन चालक असून मुलांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतला असे कौतुक केले व अनिल शिंदे व त्यांच्या पत्नी अश्विनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीम. ललिता दहितुले यांच्या हस्ते देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
सदर वेळी महाराष्ट्र राज्य शासकीय वाहन चालक संघटना, जिल्हा परिषद ठाणे चे अध्यक्ष श्री. अनिल शेलार, सचिव श्री. राजकुमार कुसाळकर, उपाध्यक्ष श्री.सुरेश पवार, उपाध्यक्ष.श्री.रमेश विधे, प्रसिद्ध प्रमुख नरेंद्र भोईर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
