देव तारी त्याला कोण मारी’,चालकाला आखडी आल्याने टेम्पोचा अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडी


भिवंडी दि.२०( गावकरी TODAY NEWS ) ‘देव तारी,त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे टेम्पो चालकाला आखडी आल्याने त्याचा भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो एका रस्त्यालगत बांधलेल्या संरक्षक गेटला धडकून अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जुनांदुरखी गावच्या हद्दीत घडली आहे.

या अपघातात टेम्पोचे अल्प प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने टेम्पो चालक बचावला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,वसई येथील एका ट्रान्सपोर्टचे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मालकीच्या आयशर टेम्पोमध्ये दररोज प्रमाणे माल घेऊन टेम्पो चालक माल खाली करण्यासाठी गुरुवारी सकाळी मुंबई येथील एका कंपनीत गेला होता.त्यानंतर टेम्पो चालक माल खाली करून येत असताना भिवंडी – पारोळ मार्गावरील जुनांदुरखी गावच्या हद्दीत आला असता,त्याला अचानक आखडी आल्याने त्याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो रस्ता सोडून रस्त्याखालील बाजूने जात होता,दरम्यान रस्त्यालगत एका घराजवळ विटांनी बांधण्यात आलेल्या संरक्षक गेटला टेम्पोची धडक बसल्याने झालेल्या अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने टेम्पो चालकाला किरकोळ मार लागला आहे.त्यामुळे ‘देव तारी,त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे टेम्पो चालकाचा जीव वाचला असून तो सुखरूप बचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *