प्रेमसंबंधातून लग्न झालेली पत्नी विभक्त राहत असल्याच्या रागातून पतीची पत्नीला भिवंडीत बांबूने मारहाण ; पतीला अटक

भिवंडी



ठाण्यातील कळव्यात प्रेमसंबंधातून लग्न झालेल्या दाम्पत्यापैकी पत्नीने पतीचे अनैतिक संबंध आणि पतीच्या क्रूरतेला कंटाळून त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ती पतीपासून विभक्त होऊन भिवंडीत राहत असल्याच्या रागातून पतीने पीडित पत्नीला शिवीगाळ करीत बांबूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काल्हेरमधून उघडकीस आली आहे.विपीन कैलास विसपुते (३६ रा.कळवा,ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या क्रूर पतीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पतीचे अनैतिक संबंध व पती पत्नीला क्रूर वागणूक देत असल्याने पीडित पत्नीने पतीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात ४९८ (अ) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ती सद्यस्थितीत भिवंडीत राहत आहे.मात्र असे असतानाही पतीने तिला सोबत राहण्यासाठी जबरीने मारहाण केली आहे.तर याबाबत पीडित महिलेने घडलेल्या प्रकारचे कथन करताना सांगितले की,विपीन आणि तिचे २०१९ मध्ये प्रेमसंबंधातून लग्न झाले आहे.मात्र २०२० मध्ये पीडित पत्नी आणि तिचा पती एका कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाला असता,पीडितेला तिच्या पतीचे नातेवाईकांमधील एका चुलतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाले,त्यावेळी तिने पतीला विभक्त होण्याबाबत सांगितले होते.मात्र तो पीडितेला त्यासाठी नकार देत तिचे त्याच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.त्यामुळे अब्रुनुकसानीच्या भीतीने पीडित पत्नी पतीविरोधात जाण्यास घाबरत होती.दरम्यान एक दिवस हिम्मत करत पीडितेने कळवा पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार नोंदवली.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरोधात ४९८ (अ) ,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे ४ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल केला आहे.तेव्हापासून पीडित महिला पतीपासून विभक्त राहत आहे.परंतु पतीची पीडितेसोबत क्रूर वागणूक सुरूच होती.दरम्यान जुलै २०२३ मध्ये म्हणजेच आठवडाभरा पूर्वीच पीडितेने पतीच्या जाचाला कंटाळून त्याच्या नकळत रात्रीच्या सुमारास तिचा संपूर्ण सामान शिफ्ट करून ती भिवंडीतील काल्हेरमधील एका इमारतीत राहत आहे.तर तिथे पीडितेच्या पतीने ८ जुलै २०२३ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास येऊन तिला धमकावून सोबत राहण्याचे सांगितले,त्यावेळी पिडीतीने नकार दिल्याने पतीने घराच्या दरवाजाच्या आतील कडी तोडून आतमध्ये जबरीने वेश करून तिचा गळा आवळला.त्यानंतर पीडितेला बांबूने बेदम मारहाण करून तिच्या घरच्यांनाही मारण्याची धमकी दिली.त्यामुळे पतीच्या क्रूरतेला कंटाळून पीडित पत्नीने पतीच्या विरोधात पुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी भादविच्या ४५२,३२४,४२७ अशा विविध कलमान्वये आरोपीत पतीवर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास पोउनि रनजीत वाळके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *