आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या दोघांना भिवंडीनजीकच्या पडघा – बोरिवलीतुन अटक

भिवंडी



एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील पडघा – बोरिवली गावात एका खोलीवर छापेमारी करत ‘आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. शरजील शेख, ( वय ३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (वय, ३६) असे पडघा बोरीवलीतुन अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी पहाटेच्या सुमारास मुंबई, ठाणे आणि भिवंडी तालुक्यातील पडघा – बोरीवली या तीन ठिकाणी छापेमारीत करत चार जणांना आतापर्यत एनआयएच्या पथकाने अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या साडे चार वाजल्याच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीवर अचानक धाड टाकली होती. या धाडी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला हे दोघे अनेक दिवसापासून याच भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. तर याच दिवशी मुंबईतील नागपाडा परिसरातून ताबीश नासेर सिद्दीकी याला अटक केली तर पुणे शहरातील कोंढवा भागातून जुबेर नूर मोहम्मद शेख अबू नुसैबा याला अटक केली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयए अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या चारही जण त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. या चौघांनी आयइडीएस आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले असून रोपींनी ‘डू इट युवरसेल्फ किट्स’ यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. ज्यात आयईडी बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, आदी माहिती होती. त्याशिवाय, त्यांच्या परदेशस्थित आयसीस या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती असेही एनआयएने म्हटले आहे.

दरम्यान, २८ जून २०२३ रोजी एनआयए पथकाने नोंदवलेल्या आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयतीच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीही एनआयए पथकांने आरोपींच्या घरांच्या झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस शी संबंधित अनेक कागदपत्रे यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे Iआयसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे सांगण्यात आले.

गेल्याच वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक व दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली होती. तर २०१४ साली कल्याण मधून चार तरुण आयसिसमध्ये भरती झाले होते. त्यामुळे ठाणे जिल्हात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील पडघा बोरीवली गावातुन दोघांच्या अटकेनंतर समोर आल्याचे दिसून येत आहे.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *