बारामती :(गावंकरी Today News नेटवर्क ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण.) इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी व ईद निमित्ताने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाभिषेकाने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यावेळी हिंदू व मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकात्मतेची भावना असल्याचा संदेश दिला .अभिषेक, भजन व ठीक १२वाजता आरती करण्यात आली यामध्ये अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट चे अध्यक्ष जमीर शेख यांनी सर्वांचे आभार मानले
तसेच बापू खारतोडे, दाऊत शेख, पांडुरंग खटके, दत्ता खारतोडे, कुणाल खटके , विश्वजीत घोळवे,राहुल गावडे, बाळासाहेब नरुटे, बापूराव खारतोडे आदी नी परिश्रम घेऊन सहकार्य केले.
