आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

भिवंडी



लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते मनपाच्या तळ मजल्यावरील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेनेजयंतीनिमित्ताने
उप-आयुक्त (मुख्यालय) दिपक पुजारी, उप- आयुक्त दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यांत आली.


छत्रपती शाहू महाराजांना कुस्तीची आवड असल्याने, १८९५ मध्ये मोतीबाग तालीम सुरु केली. त्यांनी त्यांच्या आयुष्यांत कला-क्रीडा, जलक्रांतीसाठी जल व्यवस्थापनेत धरण, तलावांची निर्मित करणे, बहुजनांना वेदोक्ताचा अधिकार मिळविण्यासाठी प्रखर आंदोलन केले, शुद्र-अतिशुद्रांच्या शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये उघडले, असे बहुजन उध्दारक, शिवरायांचा समर्थपणे वारसा चालवणारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यात छ.शाहू महाराजांनी उत्तमपणे मदत केली. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्याप्रती आदरयुक्त विधान केले होते की, एक वेळ मला विसरलात तरी चालेल, परंतू अस्पृशांना मदतीसाठी सदैव तत्पर असणा-या थोर अशा राजर्षी शाहू महाराजांना विसरु नका, उलट त्यांची जयंती सणासारखी साजरी करा असे त्यांनी शाहू महाराजांबद्दल गौरवपूर्ण शब्दांत उदगार काढले होते.
अशा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यास जयंतीनिमित्त महानगरपालिका अधिकारी व कर्मचा- यांनी मानवंदना दिली. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) प्रणाली घोंगे, सुनिल पाटील, नितीन पाटील, उद्यान अधिक्षक निलेश संख्ये, प्रभाग अधिकारी फैसल तातली, अग्निशमन अधिकारी राजेश पवार आणि मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचा-यांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यांत आली.अशी माहिती
.सुनिल धाऊ झळके माहिती व जनसंपर्क अधिकारी महानगरपालिका भिवंडी यांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *