भिवंडी महानगरपालिकेच्या नालेसफाईत अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत पाईपलाईनवर कारवाई कधी ?

भिवंडी

भिवंडी : (अनिल गजरे) पावसाळ्यात भिवंडी शहरातील पाणी तुंबण्याची समस्या टाळण्यासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी सुरू केली असून यामध्ये प्रामुख्याने नाले,गटार सफाईला प्राधान्य देण्यात आले आहे.तर गटार सफाईच्या कामात भ्रष्टाचार निविदा निघताच या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी पाचही प्रभाग कंत्राटदारांच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास किंवा कामात निष्काळजीपणा आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल आणि ठेकेदाराचे बिल पण रोखण्यात येईल असा ईशारा संयुक्त बैठकी दरम्यान दिला आहे.तसेच त्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकले जाईल अशा सूचना दिल्या आहेत.

नाल्यातून बेकायदेशीरपणे सायजिंग, डाईंगसाठी पाण्याची पाइपलाइन शहरभर घेण्यात आल्या आहेत. त्या कापून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सुध्दा आयुक्तांनी दिले आहेत.परंतु ठेकेदार निष्काळजीपणाने मनमानी कारभार करत असून कामगार म्हणून बाल मजदूर आणि महिलांना मोठ्या संख्येने राबवून घेत असल्याचे धक्कादायक वास्तव या नालेसफाईच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे.त्याचप्रमाणे कामगारांना काम करण्यासाठी ठेकेदाराकडून देण्यात येणारे सेफ्टी किट,हॅन्ड ग्लोज, बूट ड्रेस कोड देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे मजूर नाल्यात दीड ते दोन फूट उतरून काम करत असताना नाल्यातील दारूच्या बाटल्यांचा काचा,लोखंड, गंजलेल्या तारा,पत्रे,काटे आदींमुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.नालेसफाई कर्मचारी यांची ठेकेदार कुठल्याही प्रकाराची आरोग्याची काळजी घेत नाही.

तसेच नालेसफाई साठी नाल्यामधून अडथळे ठरणाऱ्या पाईपलाईन सायजिंग ,डांईगसाठी अनधिकृतपणे टाकून पाणी चोरीने घेतलेल्या पाईपलाईनचे जाळे मोठ्या प्रमाणात नाल्यात दिसून येत आहे.बेकायदेशीरपणे घेतलेल्या पाईपलाईनमुळे नाल्यात वाहत येणारा कचरा,गाळ पाईपलाईनला अडकून नाले तुडुंब भरून दुथडी वाहत आहेत.तर या सर्वेनुसार आयुक्तांनी बेकायदेशीरपणे पाईपलाईन टाकून पाणी चोरी करणाऱ्या सायजिंग,डाईंग मालकांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.मात्र असे असतानाही अधिकारी व ठेकेदार संगणमताने मनमानी करून नालेसफाई कामात हळगर्जीपणा करत असून आयुक्तांनी दिलेले आदेश फक्त कागदावरच असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *