भिवंडी दि.११( गावकरी TODAY NEWS ) नाभिक एकता महासंघाच्या विविध मागण्यांची तरतूद केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र शासनाकडे लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरतूदीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे नाभिक एकता महासंघाचे कोकण विभागीय युवक अध्यक्ष प्रफुल्ल (पप्पू) बळीराम खंडागळे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह कपिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आभार व्यक्त केले.महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नेते तथा नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव (अण्णासाहेब) बिडवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नाभिक समाज मागील २५ ते ३० वर्षांपासून विविध आंदोलने आणि निवेदनांद्वारे शासनाचे व राज्यकर्त्यांचे महामंडळाचे स्वतंत्र निर्माण व महामंडळाला निधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजासाठी केश शिल्पी मंडळाची घोषणाही केली मात्र त्यानंतर महाआघाडी सरकारने मंडळाला केराची टोपली दाखवली.परंतु सद्यस्थितीत शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्प जाहीर करताना अन्य काही मंडळांना मान्यता देवून प्रत्येक मंडळाला ५१ कोटी रु.देण्याची तरतुदीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणेच केश शिल्पी महामंडळाकरिताही तरतूद करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.याकरीता अभिजित खंडागळे,अनिल खंडागळे,गणेश खंडागळे,प्रमोद,राजेश,साईनाथ,नरेश,राजन,संतोष ,रविंद्र,मनोहर,हर्षदा खंडागळे ,रुपाली, कामिनी,नगरसेवक प्रशांत लाड,बळीराम भोईर, रमेश जाधव,नागेश जाधव,प्रकाश चव्हाण,निर्मला कदम,अक्षरा लाड,सागर गायकर,भगवान तावडे या नाभिक एकता महासंघाच्या शिष्टमंडळाने कपिल पाटील यांचे आभार व्यक्त करून त्यांना आणखी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.