अति तणाव आणि डायबेटीस यांच्या पाठोपाठ थायरॉईड विकार हे आता घरगुती नाव झाले आहे.
अमेरिकन थायरॉईड असोसिएशननुसार अमेरिकेतील जवळजवळ २० करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही.
तसेच, असे मानले जाते की *पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे.*
*थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण जगत असलेली तणावपूर्ण जीवनशैली.*
आज थायरॉईड विकाराचा फैलाव जरी वाढत असला तरी रोग्यांना *होमिओपॅथिक उपचाराचा पर्याय उपलब्ध आहे.*
थायरॉईड विकाराचे अनेक प्रकार आहेत पण दोन प्रकार सर्वात प्रचलित आहेत:
🔴हायपोथायरॉईडझम (अंतर्गत सक्रीय थायरॉईड) |Hypothyroidism (underactive thyroid)
🔴कमालीचे थायरॉईडझम (अतिक्रियाशील थायरॉईड) | Hyperthyroidism (overactive thyroid)
तुम्हाला कोणत्या प्रकारचा विकार जडलेला आहे त्याबाबतीत डॉक्टरांकडून माहिती करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच तुम्ही अनुभवत असणाऱ्या प्रत्येक विशिष्ट लक्षणांनासुद्धा तुम्ही तपासून घेऊ शकता परंतु सर्वप्रथम डॉक्टरांकडून नक्की खात्री करून घ्या, कारण पुढील उपचार सुरु करण्या अगोदर डॉक्टरच तुम्हाला व्यवस्थित वैद्यकीय तपासणीचा सल्ला देतील.
*तुम्हाला हायपोथायरॉईड झालेला असू शकतो जर:*
🔸जर तुम्ही हळूहळू दैनंदिन जीवनाच्या बाबतीत उदासीन होऊ लागलात, तुमच्यात अनुत्साह जाणवू लागला आणि सगळ्या गोष्टींच्याबाबतीत तुम्ही निरुत्साही राहू लागलात.
🔸तुम्ही नित्याचीच कामे करीत असलात तरीसुद्धा तुम्हाला नेहमीपेक्षा अतिथकवा वाटू लागतो.
🔸आजकाल तुम्हाला मलावरोध का होतो हे तुम्हाला अजिबातच कळत नाही.
🔸तुमचे अचानक वजन वाढल्याचे तुमच्या मित्रांच्या लक्षात येऊ लागते आणि त्याचे कारण तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतःच आश्चर्यामध्ये आहात की अति आहार न घेतासुद्धा वजन कसे काय वाढले आहे ?
🔸हल्ली आरश्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की तुमचा चेहरा सुजलेला दिसतो आहे.
🔸तुमचे लांब जाड केस अचानक गळू लागले आहेत आणि घरभर केसांचे पुंजके पडलेले दिसू लागतात आणि हे बघून तुम्ही चिंतीत होता.
🔸अनियमित मासिक पाळी (याची आणि इतर कारणेसुद्धा असू शकतात, डॉक्टरांकडून तपासून घेणे उत्तम राहील.
🔸तुमच्या चेहऱ्यावर केसांची लव इतक्या अतिप्रमाणात दिसू लागली आहे की त्याची तुम्हाला लाज वाटू लागली आहे.
🔸तुमच्या घश्याला सूज आलेली तुम्हाला दिसते आहे. आता नक्कीच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आलेली आहे.
*होमिओपॅथिक उपचार*
——————————
एकदा थॉयरॉईडचा विकार जडला की जन्मभर गोळ्या घ्यायला लागतात असा गैरसमज जनमानसामध्ये पसरला आहे.
*विशेष करून आजाराच्या पहिल्या टप्प्यातच होमिओपॅथिक उपचार घेतला तर अत्यंत लाभकारक सिद्ध होतो.*
*ग्रंथीच्या आतमध्ये असणारी सूज होमिओपॅथिक औषधांनी कमी होऊन जाते व तुम्ही पूर्ववत आयुष्य जगू शकता.*
*होमिओपॅथिक औषध तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये असणारे दोष नाहीसे करतात व त्यामुळे तुमचे थॉयरॉईड पूर्ववत काम करायला लागते.*
*होमिओपथी मध्ये थायरॉईड साठी अत्यंत गुणकारी औषधे उपलब्ध आहेत.*
*या औषधींचे चयन तुमच्या आजाराच्या लक्षणानुसार केले जाते. त्यामुळे तुमच्या होमिओपॅथिक तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेऊ नयेत.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*डॉ संतोष साळुंके दांडेगावकर होमिओपॅथी तज्ञ M.D. 9960421979*
*************************
