भिवंडी दि.१( गावकरी TODAY NEWS ) वेहरेगाव कार्ला येथील एकविरा देवीचा यात्रोत्सव सोहळा लाखो आगरी-कोळी भक्तांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यानिमित्त एकविरा देवी मंदिराच्या पृष्ठभागावरील सजावटीचे काम भिवंडीतील खारबाव येथील रहिवासी कल्पेश पाटील यांना एकविरा ट्रस्टच्या वतीने देण्यात आले होते.धनंजय कोळी यांच्या सहकार्याने दरम्यान कल्पेश पाटील यांनी तब्बल दीड टन झेंडूच्या फुलांचा वापर करून ‘आईचा स्वर्ग’ हा नाव एकविरा देवी मंदिराच्या पृष्ठभागावर रेखाटला होता. सजावटीचे काम उत्तमरित्या हाताळल्याने त्यांचे मावळ चे तहसिलदार आणि वेहेरगांव चे सरपंच यांच्या कडून सत्कार करण्यात आला.

कल्पेश पाटील यांनी ही मूर्ती मानाने घरी आणून त्या देवीच्या मुर्तीची पूजा करून मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवली आहे.यावेळी कल्पेश पाटील यांच्याशी गावकरी TODAY NEWS च्या प्रतिनिधि शी वार्तालाब केला असता,त्यांनी मूर्ती घरी आणत असतानाचा एक प्रसंग सांगितला.तो म्हणजे असा की,मूर्ती घेऊन ते त्यांच्या पत्नी आणि टीमसह घरी येण्यासाठी गाडीतून निघाले होते,त्यावेळी एकविरा देवी मंदिर सजावटीचा एक व्हायरल व्हिडीओ पाहून एक ५ ते ६ वर्षीय मुलगी तिच्या आईसह तिथे आली आणि जणू देवीच्या रूपातच येऊन त्या मुलीने देवीच्या हातात २० रुपयांची नोट आणि देवीला गजरा गुंफण्यास सांगून मुलगी दर्शन घेऊन निघून गेली.तसेच कल्पेश पाटील यांच्या टीममधील कुमारी पूजा सूर्यकांत पाटील या भिवंडीतील कणेरी येथील विद्यार्थीनीने ७ किलो रांगोळीचा वापर करून एकविरा देवी आई आणि देवीच्या कळसाची प्रतिकृती साकारली होती.दरम्यान तिचा मावळ तहसीलदारांकडून विशेष सत्कार करण्यात आला.तर कल्पेश पाटील यांनी सजावटीचा छंद अनेक वर्षांपासून जोपासल्याचे सांगितले.१० ते १२ वर्षांपूर्वी त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त कलिंगडावर देवीची प्रतिकृती रेखाटली होती.त्यावेळेपासून एकविरा आईच्या कृपेने त्यांनी सदर कला अंगीकारून सजावटीच्या कामास प्रारंभ केला.तो आजतागायत सुरूच आहे.ते लॉकडाऊन काळापासून मांढरदेवी कालुबाई येथे यात्रेनिमित्त सजावट करत आहेत.तसेच नवरात्री निमित्त चंपा षष्टी अन्नकोट जेजुरी येथे त्याचप्रमाणे त्यांनी मागील वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी कानिपनाथ मढी या ठिकाणीही सजावट केली आहे .

त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा भिवंडी आगरी महोत्सवात मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.त्यांनी हा सजावटीचा छंद अनेक वर्षांपासून सुरू ठेवला असून त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तेही सत्कार झाला आहे.त्यामुळे ट्रस्टने सर्व टीमचे सन्मान केला.कल्पेश पाटील यांनी एकविरा देवस्थान ट्रस्टचे आणि स्व.अनंत तरे,व स्व.आनंद पाटील ,माजी आमदार रुपेश म्हात्रे,मदन भोई,दिग्विजय पाटील,मनिष पाटील,रमेश तरे आदींसह एकविरा आई सेवक टिमचे विशेष आभार व्यक्त केले.
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी.

