
भिवंडी दि.२४( गावकरी TODAY NEWS वृत्तसेवा) भिवंडी पंचायत समिती आरोग्य विभागाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी भिवंडी परिमंडळ-२ पोलीस सभागृहात ठाणे जिल्हा ग्रामीण क्षयरोग केंद्रामार्फत क्षयरोग जनजागृती अभियाना अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प आणि सर्टिफिकेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान ‘क्षयरोग कळवा ५०० रुपये मिळवा’ अशी जनजागृतीही करण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव वाघमारे, श्री डी बी जाधव विस्तार अधिकारी पंच्यात समिती, श्री सौरभ दळवी क्षयरोग पर्यवेक्षक भिवंडी,ठाणे जिल्हा क्षयरोग विभाग अधिकारी डॉ.भाकरे,चिंबिपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.नयना पुणेकर,पडघा आरोग्य विभागाचे डॉ.गावडे,विस्तार अधिकारी देवरे,गणेशपुरी एनजीओ चे डॉ.पांडे,आरोग्य पर्यवेक्षक डॉ.डी.बी.जाधव आदींसह आशा गटपर्यवेक्षक व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले.
